ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी शहाळे प्या

25 Oct 2024 12:04:16
 
 

health 
 
शहाळ्याच्या पाण्याचे औषधी गुण,
 
 मेंदूसाठी फायदेशीर : मानवी मेंदूसाठी शहाळ्याचे पाणी अमृतासमान असते. नित्यनेमाने शहाळे प्याल्यामुळे मेंदू कैक पटीने उत्तम काम करताे. यामुळे स्मरणशक्ती उत्तम हाेते.
 
 मधुमेहात उत्तम : शहाळ्याचे पाणी पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर असते. यातील पाैष्टिक घटक शरीरात शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवत असल्यामुळे मधुमेहींसाठी हे लाभदायक असते.
 
 थायराॅइड हार्माेन ठेवते संतुलित : सकाळी शहाळ्याचे पाणी प्याल्यामुळे थायराॅइड हार्माेन नियंत्रित राहात असतात.
 
 संक्रामक राेग राेखण्यास मदत : यातील अँटीव्हायरल व अँटीबॅ्नटेरियल गुण फ्ल्यू व खाज-नायटासारख्या संक्रामक राेगांशी लढण्यास मदत करते.
 
 हृदयविकारांवर उपयुक्त : शहाळे प्याल्यामुळे हायपरटेंशन व स्ट्राेकचा धाेका संपवण्यास उपयुक्त ठरते.
 
 किडनी स्टाेन कमी करते : शहाळ्यातील पाेटॅशियम, मिनरल व मॅग्नेशियम किडनीत हाेणारे स्टाेन कमी करते. किडनीत स्टाेन निर्मितीची श्नयता कमी खूप कमी हाेते.
 
 त्वचेची चमक वाढवते : शहाळ्याचे पाणी प्याल्यामुळे त्वचा मुलायम राहते. डाग, मुरमे, सुरकुत्या व ए्निझमात 2-3 आठवडे शहाळ्याचे पाणी प्याल्यास त्वचा साफ हाेते.
 
 स्थूलता घटवते : वाढते वजन राेखण्यास शहाळ्याचे पाणी उपयुक्त असते.यामध्ये अत्यल्प कॅलरी असतात. तसेच ते प्याल्यामुळे खूप उशीरपर्यंत भूकही लागत नाही.
 
 वाढत्या वयाचा परिणाम राेखते : वाढत्या वयाचा प्रभाव टाळण्यासाठी शहाळ्याचे पाणी वापरा. यातील सायटाेकिनिंस पेशींवर सकारात्मक प्रभाव टाकून वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते.
 
 अ‍ॅसिडिटी हटवते : नित्यनेमाने शहाळ्याचे पाणी प्याल्यामुळे पचनप्रणाली व्यवस्थित राहते. यामुळे पाेटाच्या आतील लायनिंगही थंड राहते. ज्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर हाेत असते.
 
 राेगप्रतिकार क्षमता सुधारते : शहाळ्याचे पाणी शरीराची राेग प्रतिकार क्षमता वाढवत असते. शहाळ्याच्या पाण्यात खनिज क्षार भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची जवळपास सर्व गरज भागत असते.
Powered By Sangraha 9.0