18 वर्षीय इसाबेलची 88 वर्षीय टाॅमशी दृढ मैत्री झाली

    25-Oct-2024
Total Views |
 
 

age 
 
गीतकार इंदिवर यांच्या ‘हाेठाें से छू लाे तुम’, ना उमरा की सीमा हाे, ना जन्म का हाे बंधन, जब प्यार करे काेई ताे देखे केवल मन’ या गाण्याचे जिवंत उदाहरण आपल्या देशापासून 7700 कि. मी. दूर असलेल्या स्काॅटलंडमध्ये पाहायला मिळते.10 वर्षांपूर्वी, 18 वर्षीय इसाबेलची 88 वर्षीय टाॅमशी मैत्री झाली. बहुतेक वेळा, वयाच्या तफावतीचे इतके माेठे नाते पैसे मिळविण्यासाठी बांधले जाते.मात्र, 10 वर्षांनंतरही इसाबेल आणि टाॅमचे नाते अतूट आणि चर्चेत राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.फॅशनचा अभ्यास करणारी इसाबेल, सट्टेबाज म्हणून काम करते आणि त्या ठिकाणी वारंवार येणाऱ्या टाॅमच्या प्रेमात पडली आणि एक छान मैत्री सुरू झाली.
 
अलीकडेच इसाबेलनसाेशल मीडियावर खुलासा केला आहे की, मी आठवड्यातून दाेन-तीन वेळा त्यांच्या घरी जात असे. ते मला स्वयंपाक बनवायला शिकवायचे आणि कधी कधी मी त्याला बाहेर जेवायला घेऊन जायचे.आम्ही सिनेमा पाहायलाही जायचाे.नंतर मला दुसऱ्या शहरात नाेकरी मिळाली; परंतु गेल्या 10 वर्षांपासून आम्ही दर सहा आठवड्यांनी भेटताे. त्यांनी मला आयुष्यातील अनेक धडे शिकवले आणि त्यांच्या अनुभवाच्या जाेरावरच मी पुढे जाऊ शकले. स्वार्थाने बरबटलेल्या जगात प्रेमाचे असे निःस्वार्थ नाते हे आश्चर्य आहे, गरज आहे.