किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या सिनेमाने लक्षवेधी कामगिरी केली.ओटीटीवर तर त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला.
हा सिनेमा आता भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेच्या विदेशी सिनेमांच्या विभागात पाठवण्यात आलेला आहे.या सिनेमातल्या पाेलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत रविकिशनने धमाल उडवून दिली आहे. किरण राव आता आमीर खानपासून विभक्त झाली असली तरी तिचे त्याच्याशी साैहार्दाचे संबंध आहेत. लापता लेडीजचा निर्माताही आमीरच आहे.त्यामुळे आणि किरणचा त्याच्या जजमेंटवर विश्वास असल्यामुळे ती स्क्रिप्टची निवड करताना आमीरचा सल्ला घेतेच. त्यानुसार तिने लापता लेडीजचं स्क्रिप्टही त्याच्याकडे पाठवलं.
त्याला ते फारच आवडलं. खासकरून त्यातल्या इन्स्पेक्टरची भूमिका त्याला फार आवडली आणि ती आपण करावी अशी इच्छाही झाली. आमीरसारखा सुपरस्टार सिनेमात असला की त्याचा फायदा हाेताेच, हे किरणला धाेबीघाट या सिनेमामुळे माहिती हाेतं. या सिनेमालाही त्याच्या उपस्थितीचा फायदा झालाच असता. पण, तिने त्याची स्क्रीन टेस्ट घेतली आणि त्याला चक्क नापास केलं.रवीकिशनने त्यात इतकं अप्रतिम काम केलंय की खुद्द आमीरही म्हणताे की माझ्या माजी बायकाेने मला रिजेक्ट करून रवीला निवडलं हे फार उत्तम झालं. त्याने त्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. इतकी परिपक्वता हल्ली काेणत्या अभिनेता-निर्मात्यात सापडते?