तंत्रज्ञानाच्या प्रगतीत सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा

    25-Oct-2024
Total Views |
 
 

Cyber
 
 
काेणत्याही तंत्रज्ञानाचा फक्त फायदा नसताे, तर काही ताेटेही सहन करावे लागतात. सध्याच्या काळातील डिजिटल तंत्रज्ञानही त्याला अपवाद नाही. त्याच्यामुळे आपले दैनंदिन जीवन सुलभ झाले असले, तरी सायबर गुन्हेही वाढल्याची वस्तुस्थिती आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे गुन्हेगार तुमच्यासमाेर न येता लांब राहून तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकतात. त्यासाठी या गुन्हेगारांकडे विविध ्नलृप्त्याही आहेत.तुमचा फाेन वाजताे. तुम्ही ताे घेता तेव्हा ‘टेलिकाॅम रेग्युलेटरी ऑथाॅरिटी ऑफ इंडिया’कडून (टीआरएआय किंवा ट्राय) आलेला एक व्हाॅइस मेसेज एकू येताे. ‘तुमच्या माेबाइलच्या अनधिकृत वापरामुळे येत्या काही तासांत तुमचे कने्नशन बंद केले जाईल,’ असे या मेसेजमध्ये म्हटलेले असते. हा काॅल ‘ट्राय’च्या ग्राहक सेवा विभागाकडे फाॅरवर्ड केला जाताे आणि तेथे काेणीतरी तुम्हाला पुढे काय करावे याची माहिती देताे. काही वेळा सीमाशुल्ककडून एक फाेन येताे.
 
‘अमली पदार्थ आणि अन्य प्रतिबंधात्मक वस्तू असलेले एक पार्सल काेणीतरी तुमच्या नावाने पाठविले आहे. तुम्ही भरपूर रक्कम दिलीत, तर तुमच्याविरुद्धचे आराेप रद्द केले जातील आणि नकार दिलात, तर तुमच्याविरुद्ध फाैजदारी खटला दाखल केला जाईल,’ असे या काॅलवर सांगितले जाते.ही दाेन्ही उदाहरणे तुम्हाला परिचित वाटतील. कारण, सायबर गुन्हेगार सध्या या पद्धतीचा वापर करून फसवणूक करत आहेत.फसवणूक करण्यासाठी असे गुन्हेगार आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करायला लागल्याचे दिसते. त्या द्वारे संभाव्य बळीची कमकुवत स्थाने शाेधून फसवणूक केली जाते. तरुण पदवीधरांना नाेकरीचे खाेटे आश्वासन देऊन फसविले जाते, तर मध्यमवयीन पालकांना पाेलीस केसची धमकी दिली जाते आणि केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली गाेड बाेलून ज्येष्ठ आणि निवृत्तांची लूट केली जाते.
 
या वाढत्या प्रकारांची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँक, अन्य बँका आणि वित्त संस्था वारंवार सावधगिरीच्या सूचना देत आहेत. आपल्या बँक खात्याचे तपशील काेणालाही देऊ नका आणि गुंतवणुकीच्या आमिषाला फसू नका, असे आवाहन वारंवार करूनही लाेक सावध झाल्याचे दिसत नाही2024च्या पहिल्या पाच महिन्यांतच ‘नॅशनल सायबर क्राइम रिपाेर्टिंग पाेर्टल’वर सुमारे 9.5 लाख तक्रारी नाेंदविल्या गेल्या आहेत. सरासरी दर 14 सेकंदांना एक तक्रार असे त्याचे प्रमाण दिसते. या गैरव्यवहारांत या काळात भारतीयांनी 1,750 काेटी रुपयांची रक्कम गमाविली आहे.जाेधपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दिनेश कुमार या तरुणाला त्याच्या बँक खात्याचा केवायसी तपशील अद्ययावत करण्याबाबत टे्नस्ट मेसेज आला. या मेसेजबाबत त्याला काही शंका आली नाही.
 
‘गेल्या काही महिन्यांपासून मी ते खाते वापरत नसल्याने केवायसीची मुदत संपली असल्याचे मला वाटले,’ असे ताे म्हणताे. मेसेजसाेबत आलेल्या लिंकवर ्निलक करून दिनेश कुमारने त्यात बँकेचे तपशील भरले आणि नंतर काही मिनिटांत गुन्हेगाराने त्या खात्यातील सर्व 21 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ‘बँकेचे तपशील देणे ही त्याची माेठी चूक ठरली.बँक ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती काेणाला कधी द्यावयाची नसते,’ असे एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट इंटेलिजन्स आणि कंट्राेल विभागाचे उपाध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावरही दिनेश कुमारने पाेलिसांकडे तक्रार केली नाही ही त्याची दुसरी चूक ठरली.‘फसवणूक झाल्यावर तुम्ही सायबर क्राइम सेलकडे लगेच तक्रार करावयास हवी.
 
असा प्रकार घडल्यानंतर तीन दिवसांत तक्रार नाेंदविली, तर थाेडी तरी रक्कम परत मिळण्याची श्नयता असते,’ अशी माहिती बँकिंग, वित्तसेवा आणि विमा क्षेत्रांतील (बीएफएसआय) कंपन्यांना मदत करणाऱ्या ‘ब्युराे आयडी’ या कंपनीचे संस्थापक रंजन आर. रेड्डी यांनी दिली. ‘बीएफएसआय’ कंपन्यांना फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी रेड्डी हे मदत करतात. दिल्लीच्या रहिवासी आणि वित्त क्षेत्रातील प्राेफेशनल आरती चाेपडा यांनाही असा अनुभव आला. गाेव्यात राहण्यासाठी हाॅटेल शाेधत असताना त्यांना एक प्रमाेशनल लिंक दिसली.तिच्यावर ्निलक केल्यावर त्या एका मिरर वेबसाइटवर गेल्या. तेथे असलेल्या नंबरवर काॅल करून त्यांनी खाेली आरक्षित केली आणि त्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे पैसे भरले. मात्र, त्याचे काेणतेही कन्फर्मेशन न मिळाल्याने आरती यांनी त्या हाॅटेलला फाेन केला तेव्हा आम्हाला काेणतीही रक्कम मिळाली नसल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले.
 
फसवणूक झाल्याचे लक्षत येताच त्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, वेबसाइटमधील बिघाडामुळे ते श्नय झाले नाही. मग त्या जवळच्या सायबर क्राइम पाेलीस ठाण्यात गेल्या आणि तेथे त्यांनी तक्रार नाेंदविली. एवढ्यावरच न थांबता आरती यांनी त्यांच्या बँकेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. आरती यांनी अदा केलेली रक्कम काही दिवसांनी बँकेने त्यांना दिली. मात्र, पाेलिसांकडून काहीही समजले नसल्यामुळे त्यांना वाईट वाटते. फसवणूक झाल्याचे समजल्यावर आरती यांनी वेगाने केलेल्या हालचाली आणि बँकेतील वरिष्ठांची घेतलेली भेट, यामुळे त्यांना सर्व रक्कम परत मिळाली. ‘आपली फसवणूक झाल्याची लाज वाटल्यामुळे लाेक गप्प बसतात किंवा त्यांना कायदेशीर प्रक्रिया नकाे असते,’ असे आरती या म्हणतात.‘अशा घटनेची तक्रार करण्यास झालेल्या विलंबाचा फायदा गुन्हेगारांना हाेऊन ते संपूर्ण खाते साफ करू शकतात. अशा गुन्ह्यांचे मुख्य सूत्रधार परदेशी असतात आणि ते भारतात असले, तरी त्यांच्याकडून फार थाेडी रक्कम हस्तगत करता येते,’ अशी माहिती ‘सायबर लाॅ कन्सलटिंग’चे संस्थापक प्रशांत माळी यांनी दिली.
 
काेणीच सुरक्षित नाही: नवीन तंत्रज्ञानाबराेबर फार परिचय नसल्यामुळे ज्येष्ठांना फसविणे साेपे असले, तरी इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेल्या तरुण पिढीचीही फसवणूक हाेत असल्याचे दिसते. जागतिक सुरक्षेच्या क्षेत्रातील ‘कास्परस्की’ या फर्मच्या डेटानुसार, भारतातील 34 टक्के इंटरनेट यूजर्स गेल्या वर्षी सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरले. याच वर्षी या कंपनीने भारतातील 7.43 काेटी धम्नयांचा पत्ता लावून त्या ब्लाॅक केल्या.अशा फसवणुकीपासून बचावासाठी काही मूलभूत नियम पाळायला हवेत. उदा. एखादा फाेन बंद करण्याचे काम संबंधित सेवा कंपनी करत असल्याचे आणि आमचा त्याच्याशी संबंध नसल्याचे ‘ट्राय’ने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानेही (सीबीआयसी) आमचे अधिकारी फाेन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे काेणाबराेबर संपर्क साधत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
थाेडे डाेके वापरूनही बचाव करता येताे. तुमचे बँकेचे तपशील टॅ्नस रिटर्नमध्ये दिलेले असताना तुम्हाला रिफंड देण्यासाठी प्राप्तिकर विभाग तुमच्या बँकेचे तपशील कशाला विचारेल? तरीही काेणी रिफंड देण्यासाठी असे विचारत असेल, तर त्यात नक्की गैरप्रकार असल्याचे लक्षात ठेवा, असा सल्ला ‘टॅ्नसस्पॅनर.काॅम’चे मुख्य अधिकारी सुधीर काैशिक यांनी दिला आहे. ‘भरभक्कम परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या ऑफरपासूनही सावध राहायला हवे. तुमच्या गुंतवणुकीवर 30-40 टक्के परतावा मिळणे श्नय आहे का, याचा विचार करा. गुंतवणुकीची आमिषे दाखविणारी अ‍ॅप आणि वेबसाइटपासून लांब राहणे शहाणपणाचे ठरते. त्यावरील माहिती खाेटी असते. एखाद्याने 10 हजार रुपये गुंतविल्यावर त्याला काही दिवसांत 30-40 टक्के परतावा मिळणे श्नय नसते. पण, लाेकांना असलेल्या पैशांच्या आकर्षणाचा गुन्हेगार फायदा घेतात,’ असे दिल्ली पाेलिसांच्या दक्षिण जिल्ह्याचे पाेलीस उपायुक्त अंकित चाैहान यांनी स्पष्ट केले.