आर्टिफिशियल इंटेलिजन्स साक्षरतेला जाेडण्याची याेजना

25 Oct 2024 11:47:12
 
 


AI
 
AIम्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर व परिणाम दाेन्ही सातत्याने वाढत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्याचा उपयाेग लक्षात घेऊन नवनवीन संशाेधन हाेत आहे. आता भारतातील शिक्षण क्षेत्रात दैनंदिन वापरातील उपकरणांमध्ये AIचा वापर वाढताे आहे. भारतात गुगलच्या मदतीने साक्षरतेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत ही अभिनंदनीय गाेष्ट आहे.पन्नास लाख लाेकांना AI साक्षरतेला जाेडून घेण्याची याेजना आहे. AIआधारित अभ्यासक्रम तयार करून शाळकरी मुलांना समजेल असे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल.
शाळेतील शिक्षणपद्धतीत AIमार्फत शिक्षण देणे हे एक नवे पाऊल म्हणावे लागेल. नुकतीच गूगल फाॅन इंडिया इव्हेंटमध्ये साक्षरता अभियानाची घाेषणा करण्यात आली. तिला ‘AI समर्थ’ असे नाव देण्यात आले. AIसाक्षरता ज्ञान फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालक व शिक्षकांनाही देण्यात येणार आहे.
 
स्मार्टफाेन आणि इंटरनेट खेड्यांपर्यंत पाेहाेचल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांमध्ये टे्ननाॅलाॅजी/तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्मार्टफाेन आणि टॅबचा वापर शाळांमध्ये वाढल्यानंतर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी AIसाक्षरता गरज बनून गेली आहे. AIसमर्थ शब्दाचा अर्थच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराबाबत माहितगार हाेणे व सिस्टीमशी जुळवून घेत त्या त्या विषयांत समर्थ/प्रवीण हाेणे असा आहे. बऱ्याच वर्षां पूर्वी भारतातील शाळांमध्ये असा विद्यार्थी व शिक्षक तंत्रज्ञानात किती रस घेतात हे जाणून घेण्यासाठी सर्वे क्षण करण्यात आले हाेते. जर त्यांना याबाबत रस असेल तर ते या विषयात खाेल उतरून अधिक जवळ जातील हे स्पष्टच आहे.
AIकाय आहे, हे फ्नत ऐकण्यात अर्थ नाही.AI टे्ननाॅलाॅजीची प्रॅ्निटकल समज असणे जास्त महत्त्वाचे आहे. ग्रामीण विद्यार्थी व शिक्षकांना AI साक्षरता अभियानाशी जाेडून घेतल्यास चमत्कार घडेल हे न्नकी.
 
येत्या पाच वर्षांत पन्नास लाख व्यक्तींना AI साक्षरतेशी जाेडण्यात येणार आहे. या अभियानामुळे वर्तमान क्षेत्रातील कठीण समस्यांचे निवारण हाेऊ शकेल, अशी आशा आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना AI सारख्या कठिण विषयांचे ज्ञान देणे हे आव्हानात्मक काम आहे, परंतु स्वैच्छिक संस्था या दिशेने काम करीत आहेत. AI साक्षरता अभियानास शाळेतील अभ्यासक्रमाशी जाेडण्यात येईल. AI तज्ज्ञ म्हणतात की जसजसे साक्षरता अभियान पुढे जाईल आणि लाेकांमध्ये त्याविषयीची समज वाढत जाईल तसतसा त्याचा वापरही वाढत जाईल. त्याचप्रमाणे नव्या AI चा शाेध घेणेही वाढेल.काॅर्पाेरेट कंपन्या आणि सुशिक्षित वर्गाला AIचे ज्ञान देणे त्या मानाने अगदीच साेपे आहे, पण खेड्यांतील विद्यार्थी व शिक्षकांना त्याबाबत साक्षर करणे हे एक माेठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन नावाच्या स्वैच्छिक संस्थेने हा प्राेजे्नट हाती घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0