केवळ लहान मुलेच नव्हे तर माेठी माणसेही खेळतात.काही जणांना खेळणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. परंतु खेळण्यातूनच विकास हाेत असताे.लहान मुले खेळातून हळूहळू शिकत असतात. जसजसे वय वाढत जाते तसे खेळण्याचे स्वरूप बदलत जाते. खेळल्यामुळे मुलांच्या शरीराला व्यायाम मिळताे आणि थकल्यामुळे भूक लागून जास्त जेवले जाते आणि आराेग्य चांगले राहते. काही खेळांमुळे शारीरिक काैशल्याबराेबर बुद्धीचाही वापर करावा लागताे. त्यामुळे त्याचा उपयाेग ज्ञान मिळवण्यासाठी हाेऊ शकताे. काम करून कंटाळलेल्या माणसाला थाेडा वेळ खेळल्याने विरंगुळा मिळताे.