महापालिकेचे 12 हजारांवर कर्मचारी निवडणूक कामावर

    22-Oct-2024
Total Views |
 
 
ma
 
मुंबई, 21 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
मुंबई महापालिकेच्या 12 हजार कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, तर मतदानाच्या दिवशी आणि आधीचे दोन-तीन दिवस महापालिकेचे आणखी सुमारे 40 हजार कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असतील. निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेतून 40 ते 45 हजार कर्मचारी जाणार असून, यापैकी महापालिका शाळांतील सुमारे 1200 शिक्षक आधीच बीएलओच्या कामासाठी पाठवण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी आणखी पाच हजार शिक्षक निवडणुकीच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहेत. मुलांच्या परीक्षा याच कालावधीत असल्याने पुढील दोन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत तरी शिक्षकांची कमतरता भासणार असून, याचा शैक्षणिक कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील 1 लाख कर्मचाऱ्यांपैकी 40 ते 50 हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत.