दरमहा बाराशे कोटींचा ऑनलाइन भरणा

    22-Oct-2024
Total Views |
 
 
da
 
पुणे, 21 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
महावितरणच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्यात पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वर्गवारीच्या ग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या वर्गवारीतील 41 लाख 12 हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहक दर महिन्याला सुमारे 1195 कोटी 70 लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करत आहेत. महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत सर्व प्रकारची ग्राहकसेवा एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे.
 
गेल्या तीन महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील 1 कोटी 26 लाख 38 हजार 606 लघुदाब ग्राहकांनी 3587 कोटी 32 लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला. त्यानुसार दर महिन्याला 42 लाख 12 हजार (79 टक्के) ग्राहक सरासरी 1195 कोटी 70 लाखांच्या (80 टक्के) वीजबिलांचा घरबसल्या भरणा करत आहेत. दर महिन्याला पुणे जिल्ह्यात 25 लाख 84 हजार 430 ग्राहक 796 कोटी, सातारा जिल्ह्यात 4 लाख 63 हजार 220 ग्राहक 75 कोटी 81 लाख, सोलापूर जिल्ह्यात 3 लाख 20 हजार 140 ग्राहक 83 कोटी 27 लाख, कोल्हापूर जिल्ह्यात 5 लाख 44 हजार 650 ग्राहक 169 कोटी 27 लाख आणि सांगली जिल्ह्यातील 3 लाख 430 ग्राहक 71 कोटी 33 लाखांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करत आहेत.