कन्या

    20-Oct-2024
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्हाला अचानकपणे चांगली बातमी कळू शकते.करिअरमध्ये प्रगती हाेईल. मुलांकडून आनंदाची बातमी कळू शकते. या आठवड्यात प्रवासाचे याेग आहेत. कागदपत्रांबाबत धैर्य बाळगावा. काेणताही निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. .
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.तुम्ही कामासंबंधित नव्या याेजना बनवण्यात यशस्वी व्हाल. व्यापारातही नव्या संधी चालून येतील. येत्या सणासुदीचे भान राखून व्यावसायिकांनी या आठवड्यातच व्यवसायात गुंतवणून करून ठेवायला हवी.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या माणसांसाठी काही चांगले करण्याचा विचार करू शकता. परंतु नात्यांमध्ये काही मतभेद हाेण्याची व त्यामुळे वादाची श्नयता आहे. पण जर तुम्ही शांतपणे संवाद साधला आणि धैर्य राखले तर समस्या दूर हाेऊ शकतात.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमच्या आराेग्यात सुधारणा हाेईल, पण पाेटासंबंधित त्रास सतावू शकताे. राेजचे जेवण वेळच्या वेळी घ्यावे आणि जागरण टाळावे. विशेषकरून राेज सकाळी उपाशीपाेटी पाेटासाठी उपयुक्त याेगासने करावीत. तिखट तेलकट खाणे टाळावे.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात गाेष्टी वाढवू नयेत व वाद घालणे टाळावे.
 
 उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा व हिरवे मूग दान करावेत.