या आठवड्यात तुम्ही केलेल्या परिश्रमाचे फळ तुमच्या पदरात पडेल.नवे काम सुरू करण्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. काेणासाेबतही विनाकारण वाद घालणे टाळावे. त्यामुळे चांगले संबंध बिघडू शकतात. साध्या क्षुल्लक गाेष्टींचा राईचा पर्वत बनवल्यास तुम्हालाच त्रास हाेईल.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. व्यापारातही तुमच्यासाठी नव्या संधी चालून येण्याची श्नयता आहे. पण नुकसान टाळण्यासाठी त्याबाबत घ्यावयाचे निर्णय विचारपूर्वक घेणे याेग्य ठरेल.
नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिक सुखसमृद्धीचा राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत तसेच मित्रमंडळीत आनंदात वेळ घालवाल. प्रेमसंबंधात असणाऱ्या मंडळींनाही या आठवड्यात सुखद अनुभव मिळतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींकडून मदतही मिळेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहणार आहे. पण आत्तापर्यंत जाेमाने केलेल्या कामाचा ताण तुमच्या तब्बेतीवर पडण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा आणि शारीरिक अशक्तपणा जाणवू शकताे. मानसिक व शारीरिक ताकद वाढवण्यासाठी सकस आहारावर भर द्यावा.
शुभदिनांक : 22, 23, 26
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : प्रवास करताना सावध राहावे व वाहन सावकाश चालवावे.
उपाय : गुरुवारी श्रीविष्णूचे पूजन करावे व केळी दान करावीत.