सिंह

20 Oct 2024 22:33:35
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन टिकवून ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.त्याचप्रमाणे आर्थिक लाभ हाेण्याचेही संकेत दिसून येत आहेत. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगतीचे याेग आहेत. वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल. ते तुमच्या कामाची वाखाणणी करतील. व्यवसायात नव्या साैद्यांवर तुम्ही विचार करू शकता.हे नवे साैदे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राहणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंदाचे व साैख्याचे राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाेबत आनंदात वेळ घालवाल. प्रेमी मंडळीच्या प्रेमसंबंधात माधुर्य राहील. प्रेमाचे विवाहात रुपांतर करू इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण हाेईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. विशेषत: तुम्ही बाहेरचे मसालेदार व तळकट तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कारण या आठवड्यात तुम्हाला पाेटाच्या समस्या हाेण्याची श्नयता आहे. गॅस, अपचन व जुलाब हाेऊ शकतात.
 
 शुभदिनांक : 22, 23, 26
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : अहंकार साेडा अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येईल.
 
 उपाय : सूर्याला अर्घ्य द्यावा व रविवारी गूळ दान करावा.
Powered By Sangraha 9.0