जुनी लांबलेली कामे या आठवड्यात पूर्ण हाेतील. त्यामुळे तुम्हाला नवी कामे मिळवण्याची व पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या आठवड्यातील महत्त्वाची टीप म्हणजे काेणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. त्याचप्रमाणे जादा तणाव व चिंता टाळावी. काेणतीही बेपर्वाई करू नये.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम संकेत मिळणार आहेत. तुमच्या सहकर्मचाऱ्यांची तुम्हाला खूपच मदत मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे काम साेपे हाेईल. व्यवसायात लाभदायक व्यवहार हाेतील. ज्यामुळे तुमच्या नफ्यात वाढ हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राहणार आहे.कुटुंबासाेबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला मूळ गावी जाण्याची संधीही लाभू शकते. प्रेमसंबंघातही सकारात्मकता टिकून राहील. त्यामुळे तुमच्या साैख्यात भर पडेल.
आराेग्य : या आठवड्यात घराबाहेर वावरताना तुम्ही तुमची तब्बेत बिघडू नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषत: थंडीमुळे सर्दी-पडशाचा व ताप-डाेकेदुखीचा त्रास हाेणार नाही याकडे जास्त लक्ष द्यावे. त्यासाेबतच नियमितपणे याेगसाधना व ध्यानधारणा करावी.
शुभदिनांक : 20, 21, 25
शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या ऊर्जेचा याेग्य दिशेने वापर करावा व नकारात्मक दृष्टिकाेन टाळावा.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी व हिरवे मूग दान करावेत.