मिथुन

20 Oct 2024 22:34:31
 
 

Horoscope 
जुनी लांबलेली कामे या आठवड्यात पूर्ण हाेतील. त्यामुळे तुम्हाला नवी कामे मिळवण्याची व पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या आठवड्यातील महत्त्वाची टीप म्हणजे काेणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. त्याचप्रमाणे जादा तणाव व चिंता टाळावी. काेणतीही बेपर्वाई करू नये.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम संकेत मिळणार आहेत. तुमच्या सहकर्मचाऱ्यांची तुम्हाला खूपच मदत मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे काम साेपे हाेईल. व्यवसायात लाभदायक व्यवहार हाेतील. ज्यामुळे तुमच्या नफ्यात वाढ हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राहणार आहे.कुटुंबासाेबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला मूळ गावी जाण्याची संधीही लाभू शकते. प्रेमसंबंघातही सकारात्मकता टिकून राहील. त्यामुळे तुमच्या साैख्यात भर पडेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात घराबाहेर वावरताना तुम्ही तुमची तब्बेत बिघडू नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषत: थंडीमुळे सर्दी-पडशाचा व ताप-डाेकेदुखीचा त्रास हाेणार नाही याकडे जास्त लक्ष द्यावे. त्यासाेबतच नियमितपणे याेगसाधना व ध्यानधारणा करावी.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या ऊर्जेचा याेग्य दिशेने वापर करावा व नकारात्मक दृष्टिकाेन टाळावा.
 
 उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी व हिरवे मूग दान करावेत.
Powered By Sangraha 9.0