मकर

20 Oct 2024 22:27:57
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल आणि नव्या लाेकांच्या संपर्कात याल. तुमच्यासाठी हा आठवडा यश मिळवून देणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. त्यातून तुम्हाला मनाजाेगा आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात करियरमध्ये तुम्हाला भरघाेस यश लाभेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या कामातील यशामुळे नवी ओळख मिळेल. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा हाेईल. बिझनेसमध्येही लाभ मिळण्याची स्थिती राहणार आहे. नव्या याेजना बनवू शकता.
 
 नातीगाेती : गेल्या आठवड्यात कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्हाला कुटुंबाकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ मिळाला नव्हता. त्याची भरपाई तुम्ही या आठवड्यात कराल. तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसाेबत घालवाल. त्यांच्यासाेबत नातेवाईकाच्या घरीही जाण्याची याेजना आखाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण कामाच्या वाढत्या व्यापाचा परिणाम तुमच्या आराेग्यावर हाेण्याची श्नयता आहे.कामाचा जास्त ताण घेतल्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा व डाेकेदुखीचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. याेग व ध्यानधारणा करावी.
 
 शुभदिनांक : 20, 21, 25
 
 शुभरंग : पांढरा, निळा, हिरवा
 
 शुभवार : रविवार, मंगळवार, शनिवार
 
 दक्षता : तब्बेतीची काळजी घ्यावी व कामाचे ओझे टाळावे.
 
 उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. काळे तीळ दान करावेत.
Powered By Sangraha 9.0