मेष

    20-Oct-2024
Total Views |
 

Horoscope 
हा आठवडा आर्थिक दृष्ट्या शुभ असणार आहे. अचानक धनलाभ हाेण्याची श्नयता आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या सहकर्मचाऱ्यांकडून सहकार्य लाभेल.तुम्ही तुमच्या कामामध्ये धैर्य आणि संयम राखायला हवा. या आठवड्यात तुम्हाला उत्साही व उल्हसित वाटेल.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या करिअरच्या क्षेत्रात अनेक नव्या संधी चालून येतील. जे जातक नाेकरीच्या शाेधात असतील त्यांना काही उत्तम संधी मिळणार आहेत. व्यावसायिकांच्या व्यवसायातही नवे आणि त्यांचा फायदा करून देणारे संपर्क जाेडले जातील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये गाेडवा टिकून राहील.कुटुंबीयांसाेबत वेळ घालवण्याची संधी तुमच्यासाठी चालून येत आहे.त्याचप्रमाणे एखाद्या खास व्यक्तीसाेबत तुमचे संबंध अधिक घनिष्ट हाेऊ शकतात. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सुखद असणार आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत सामान्य राहील, पण तरीही तुम्ही जास्त कामाचा तणाव घेतल्यास त्याचा तुमच्या तब्बेतीवर परिणाम हाेण्याची श्नयता टाळता येणार नाही. तुम्हाला नियमितपणे व्यायाम करण्याचा आणि खाण्या-पिण्याबाबत हयगय न करण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
 शुभदिनांक : 22, 23, 26
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : या आठवड्यात रागावर व बाेलण्यावर ताबा ठेवावा.
 
 उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमंताची पूजा करावी व गूळफुटाणे दान करावेत.