आहारातून हाेताेय हानिकारक पदार्थांचा भडिमार

19 Oct 2024 23:19:30
 
 

health 
अवाजवी साेडियम
 
आपण आपल्या राेजच्या आहारात जे खाद्यपदार्थ खाताे त्यांच्या जाहिरातीत चलाखीने फेरफार केले जातात. अनेकदा आराेग्यदायी मानल्या जाणाऱ्या अन्नात साेडियमचे प्रमाण जास्त असते. आपण बाजारातून आणलेल्या पास्ता साॅस वा सलाद ड्रेसिंगमधील साेडियमचे प्रमाण कधीही पाहात नाही. यातील साेडियमचे अवास्तव प्रमाण आराेग्यास हानिकारक ठरू शकते.
 
हानिकारक लाे फॅट ड्रेसिंग
 
आपण अनेकदा सुपर मार्केटमधून फॅटी सलाद ड्रेसिंग ऐवजी लाे फॅट ड्रेसिंगची निवड करताे. ही निवड चुकीची असते कारण कॅलरीज कमी करण्यासाठी लाे फॅट ड्रेसिंगमध्ये विविध पदार्थ टाकतात जे दीर्घकाळासाठी आराेग्यास हानिकारक ठरतात.त्याऐवजी ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑइल वा व्हिनेगर वापरू शकता.
 
चवदार पण घातक
 
नाश्त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हाेल सीरीयलमध्ये साखरेचे थर लावले जातात.याऐवजी नाश्त्यात उपमा वा पाेहे खाणे उत्तम.तसेच बाजारात विविध चवींचे दही मिळते पण हे दही चविष्ट बनवण्यासाठी त्यात इतके पदार्थ मिसळले जातात की, त्याची पाैष्टिकता नष्ट हाेते. असे रंगीत दही खाण्याऐवजी साधे दही खाण्यात माेठा फायदा असताे.
 
हानिकारक चीप्स
आजकाल सारेजण चीप्स खात असतात, पण केळीच्या असाेत वा बटाट्याच्या काेणत्याही चीप्स शरीरास हानिकारकअसतात. बहुतेक चीप्स शरीराला पाेषण तर देत नाहीतच पण कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण वाढवतात. काेणत्याही डीप फ्राय चीप्स खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढताे.केळीचे वेफर्स खाण्यापेक्षा ताजी केळी खाणे फायदेशीर असते.
 
घातक डाएट साेडा
 
डाएट साेडा व फळांचा रस अशा पेचात मार्केटिंग जास्त व सत्व कमी असते. डाएट साेडा हे फक्त मार्केटिंग तंत्र आहे. डाएट साेडा हा आपल्याला नेहमीच्या साेड्यापेक्षा चांगला पर्याय वाटताे. पण डाएट साेड्यात चवीसाठी विविध पदार्थ व कृत्रिम स्वीटनर्स टाकले जातात. ज्यामुळे डाएट साेडा प्याल्यामुळे बऱ्याचदा साखरेचे प्रमाण वाढते.तसेच फळांच्या रसांत ताे शंभर टक्के नैसर्गिक असल्याचा दावा केला जाताे. पण त्यातही साखर टाकली जाते.
 
फसवा प्राेटीन बार
 
असाच एक प्रयाेग प्राेटीन बारच्या नावाखाली चालू आहे. अनेक कंपन्या प्राेटीन बारच्या नावाखाली साखरेचे बार विकतात.बहुतेक बारमध्ये साखर असल्यामुळे ते खाल्ल्यास रक्तातील साखर वाढते. प्रथिने मिळवायची असतील तर तथाकथित प्राेटीन बारपेक्षा दूध, शेंगदाणे वा सुकामेवा घ्या.पारंपरिक चिक्की घरी बनवून खाल्ली तरी ती पाैष्टिक बारपेक्षा जास्त पाैष्टिक असते.
Powered By Sangraha 9.0