चांगली आई हाेण्यासाठी मुलांशी संवाद साधा

    19-Oct-2024
Total Views |
 
 
 

child 
रागावर प्रेमाचे वर्चस्व
 
मुलांच्या मनावर आपलं म्हणणं काेरण्याचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. जर मूल आनंदी असेल आणि तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बाेललात तर मुलं त्या गाेष्टीसाठी स्वतःला पटकन मानसिकरित्या तयार करतात.
 
भाषण नाही, गाेष्ट ऐकवा
 
सतत मुलांना सल्ले देण्याऐवजी कधी कधी मुलांसम ाेर काल्पनिक स्थिती निर्माण करा. मुलांना त्यांचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी द्या. यामुळे तुमच्या मुलांच्या चंचल गाेष्ट ऐकण्याची संधी, तुम्हाला मिळेल. जर तुम्ही भाषण देण्याऐवजी मुलांना गाेष्टीच्या माध्ममातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मुलांना कंटाळाही येणार नाही आणि त्यांना तुमचं म्हणणं पटेल. एक गाेष्ट अवश्य लक्षात ठेवा, तुम्ही सतत तुलना करू नका. जर तुमचं मूल चांगलं काम करत असेल तर त्याचं काैतुक करायला विसरू नका.
 
आधी स्वतःला शिस्त लावा
 
मुलांना कधीही काही शिकविण्यापूर्वी तुम्ही स्वतः त्या सवयींचा अवलंब करा. कारण मुलंही आई-वडीलांचे अनुकरण करत असतात. म्हणून जसं वागायला, बाेलायला तुम्ही मुलांना सांगता आहात, त्याचं पालन स्वतः आधी करा. मुलं तुमच्याकडूनच अनेक गाेष्टी शिकत असतात.
 
नियम बनवा, पण विचारून
 
जर तुम्ही काेणता नियम बनवत असाल तर ताे मुलांना विचारून तयार करा. त्यामध्ये मुलांचा सहभाग असू द्या. त्याच्या विचार आणि इच्छांकडे दुर्लक्ष करणे याेग्य नाही. आवश्यकतेनुसार, नियमांमध्ये लवचिकता देखील आणायला हवी. आणखी एक गाेष्ट म्हणजे नियम बनविताना मुलांच्या वयाचाही विचार करा.
 
मार नकाेच
 
मुलांना चुकीची गाेष्ट करण्यापासून परावृत्त करणे, याेग्यच आहे. पण असं करत असताना मुलांचा अपमान हाेणार नाही, याची काळजी अवश्य घ्या.तसंच मुलांना इतर लाेकांसमाेर ओरडू नका. तसंच चुकूनही त्यांच्यावर हात उचलू नका. मुलांना ओरडा किंवा प्रेमाने समजावून सांगा, पण मारू नका. मारण्यामुळे मुलं हट्टी हाेतात.माेठ्यांचा आदर करणे साेडून देतात.
 
लालूच दाखवू नका
 
लक्षात ठेवा, तुमचा जमाना आता मागे पडला आहे. जेव्हा मुलांना लालूच दाखवून आपल्याला हव्या त्या गाेष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जात. हल्ली मुलं प्रत्येक गाेष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.काेणताही बदल किंवा अडसर ते तेव्हाच स्वीकारतात, जेव्हा तुम्ही त्यांना त्याविषयीची कारण सांगता आणि ते मुलांना पटतं.
 
अट ठेऊ नका...
मुलांना आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांच्या समाेर अटी ठेऊ नका. असं केलंस तर ते मिळेल, वगैरे.तुमच्या अटी त्यांच्यावर लादण्यापेक्षा मुलांना स्वत: पर्याय शाेधण्याची संधी द्या.