मनापासून ठरवले, तर हवे ते मिळवू शकता

18 Oct 2024 23:12:56
 
 

thoughts 
 
संधी तर सर्वांना लाभते. काही ती दाेन्ही हातांनी पकडतात, तिचा उपयाेग करून घेतात, तिचा भरपूर फायदा करून घेतात. इतर काहीजण संधी जाऊ देतात. आपल्या हातून निसटू देतात. नंतर हात चाेळत बसतात आणि पश्चात्ताप करीत राहतात. काही जण तर दार ठाेठावणाऱ्या संधीला ओळखूही शकत नाहीत. वरून संधी न मिळाल्याचे रडगाणे गात राहतात.देशाच्या फाळणीमुळे लाखाे लाेक लूटमार हाेऊन बेघर हाेऊन भारतात आले हाेते. हिंमत आणि धैर्य असणाऱ्यांनी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले. काडी काडी जमवून पाया रचला आणि समाजात आपले स्थान निर्माण केले. ज्यांनी सुरुवातच केली नाही, इनिशिएटिव्ह दाखवली नाही, त्यांना काेणतेही यश मिळाले नाही.असे म्हणतात की, परमात्माही त्यांनाच मदत करताे जे स्वत: स्वत:ची मदत करतात.
 
सकारात्मक दृष्टिकाेन आणि पराेपकाराची प्रवृत्ती माणसाला फ्नत लाेकप्रियच बनवत नाही तर त्याला स्वत:लाही एका अनाेख्या आणि आगळ्या आनंद आणि समाधानाने परिपूर्ण ठेवते.घर असाे वा कामाचे ठिकाण, काही जण आपल्याअस्तित्वानेच एका निकाेप, सहज वातावरणाची निर्मिती करतात.अशा लाेकांचे आचरण दुरावा कमी करण्यास उपयु्नत असते. ते पर्नयांनाही आपलेसे करून घेतात. असे वाटते की, अशी माणसे चहुकडे आनंद उधळत चालत आहेत, पण का काेणास ठाऊक काही जणच असे असतात.आपण ठरवले तर आपणही या काही लाेकांसारखे हाेऊ शकता. गरज आहे ती आपल्या वागण्यात, दृष्टिकाेनात, विचारात एक सकारात्मक बदल करण्याची. हा गुण जन्मजात नसताे तर ताे सरावाने, सातत्याने आणि दृढ संकल्पानेही मिळवता येऊ शकताे.
Powered By Sangraha 9.0