मुलाखत देताना उमेदवाराने तारतम्य बाळगाव

17 Oct 2024 23:15:52
 
 

Interview 
 
अर्थात मुलाखतीमध्ये तुमचा आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असताे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर उत्तरे कशी द्यायची याबराेबरच पॅनलला कुठले प्रश्न विचारायचे नाही हे तुम्हाला माहित असू शकते. त्यामुळेच मुलाखत घेणाऱ्यांना काही चांगले प्रश्न विचारले देखील याेग्य कसे नसते हे लक्षात यावे म्हणून काही मुद्दे...
 
तुमची कंपनी काय उत्पादन करते?
 
नाेकरीसाठीच्या मुलाखतीला येताना पूर्ण तयारी करून येणे आवश्यक असते. त्यामध्ये आपण ज्या कंपनीत मुलाखतीसाठी जात आहाेत, ती कंपनी काेणती सेवा देते किंवा काय उत्पादन करते याची माहिती असणे अपेक्षित आहे. त्यामुळेच मुलाखतीच्या वेळी तुम्ही जर का पॅनेलला तुमची कंपनी काय उत्पादन करते, असा प्रश्न विचारला तर तुम्ही पुरेशी तयारी करून आलेला नाहीत हे दिसून येते. त्यामुळेच तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी कंपनीबाबत इंटरनेटवर सर्च केले तरी देखील तुम्हाला संबंधित कंपनी काय काम करते हे समजेल.
 
तुम्ही उमेदवाराचा भूतकाळ तपासता का?
 
तुमच्या भूतकाळात तुमच्याकडून कुठल्याही चुकीच्या गाेष्टी झाल्या नसतील आणि तुमचा भूतकाळ अगदी स्वच्छ असेल तरी देखील असा प्रश्न तुम्ही विचारलात तर मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या मनात संशय निर्माण हाेऊ शकताे. त्यातून पुन्हा तुमच्यातील संवाद हा काहीसा अवघडल्यासारखा ठरू शकताे. कारण त्यामुळे मुलाखत घेणाऱ्यांच्या मनात असा संशय निर्माण हाेऊ शकताे, की तुम्ही काहीतरी लपवता आहात किंवा या कामासाठी तुम्ही सर्वाेत्कृष्ट उमेदवार नाही.
 
या पदासाठी चे वेतन काय आहे?
 
हा प्रश्न तुम्हाला याेग्य वाटत असला, तरी मुलाखतीच्या पहिल्याच फेरीत हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरू शकते. मुलाखतीच्या दुसऱ्या नव्हे तर अंतिम किंवा तिसऱ्या फेरीत तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकता.परंतु सुरुवातीलाच तुम्ही असा प्रश्न विचारला तर तुम्ही दुसऱ्या फेरीत पाेहाेचणे श्नय नाही याची नाेंद घेतली पाहिजे.या खेरीज महिन्यातून मला किती सुट्ट्या मिळतील, मी घरून काम करू शकताे का, माझ्या पगारात केव्हा वाढ हाेईल, आजारपणाच्या रजेबाबत कंपनीचे काय धाेरण आहे, मी शुक्रवारी ऑफिस मधून लवकर निघू शकताे का, माझ्यासाठी लवचिक वेळापत्रक मिळू शकेल का, साेशल मीडियाचा वापर करण्याबाबत कंपनीची काय भूमिका आहे, कामाच्या ठिकाणी मी साेशल मीडियाचा वापर करू शकताे का, कंपनीची स्पर्धक कंपनी काेण आहे, अशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीच्या वेळी पॅनलला विचारणे टाळावे.
 
निवड झाल्यावर कंपनीतील अन्य पदांसाठी देखील मी अर्ज करू शकताे का?
 
या प्रश्नातून तुमची एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती नसल्याचे दिसून येते. तुम्ही नाेकरीवर रुजू हाेण्याआधीच बदल करू पाहत असल्याची भावना मुलाखत घेणाऱ्यांची हाेऊ शकते. मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती नेहमी चांगले आणि दीर्घकाळ काम करू शकतील अशा उमेदवारांच्या शाेधात असतात.
 
 
Powered By Sangraha 9.0