लक्ष विचलित हाेणार नाही, याची काळजी घ्या

    16-Oct-2024
Total Views |
 

dyan 
लक्षात ठेवा की, आपण तुमच्या आंतरिक मानसिक स्थितीविषयी बाेलत आहाेत. म्हणून स्पष्टता मिळविण्याचा अर्थ म्हणजे घराची सफाई करणे आणि प्रत्येक खाेलीला व्यवस्थित करण्याइतका साेपा नाही. आपल्या सर्वांना हेच शिकविले जाते की, जर आपण आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवले नाही तर, ताे नियंत्रणाबाहेर जाईल. ताे एका मुलाप्रमाणे चंचल असताे. ताे बेशिस्त हाेईल. पण खूप कमी लाेक आहेत, जे याचा शाेध घेण्याचा प्रयत्न करतात की, खराेखरच मेंदूचा स्वभाव इतका गाेंधळात पडलेला आहे का? त्याला व्यवस्थित प्रकारे करता येणार नाही का? जगभरातील अध्यात्मिक सभ्यता आणि परंपरा सांगतात की, मनुष्याच्या मेंदूतील खळबळ केवळ एका प्रवृत्तीच्या कारणाने हाेते - स्वत:ला न ओळखणे. तुम्ही कठपुतळी नाही आहात की, दुसऱ्या लाेकांच्या अपेक्षा आणि दबावांना पूर्ण करत राहाल.
 
ध्यान धारणा करा : ध्यानाच्या मदतीने तुम्ही आपल्या मेंदूला सहज स्पष्टतेच्या स्तरावर घेऊन जाऊ शकता. नदीच्या किनाऱ्यावर पाणी अतिशय वेगाने वाहात असते. पण जसजशी पाण्याची खाेली वाढते, पाण्याची हालचाल कमी हाेते. सर्वात खाेल ठिकाणी पाणी इतके स्थिर असते की, त्यात काहीही हालचाल हाेत नाही. त्याच प्रमाणे मेंदूच्या खाेलीतही एक भाग आहे, जिथे केवळ शांती, स्पष्टता आहे. आपल्या मेंदूत शिथिलता आणि सतर्कता यांच्यात एक आश्चर्यकारक संतुलन आहे. शांत आणि स्थिर मेंदू अपेक्षांना पूर्ण करण्यात सर्वात जास्त समर्थ असताे. कारण त्याला आतमधील सखाेलतेतून सूचना मिळतात. त्याची आत्मचेतना नेहमी त्याच्यावर वर्चस्व ठेवत असते. हे माहिती असते की, आपण काय आहाेत? काेणत्या दिशेने जात आहाेत. तेव्हाच समजते की, दरराेज आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे.
 
काय करावे?
 
 आपल्या आजूबाजूचे वातावरण व्यवस्थित ठेवा.
 तणाव निर्माण करणाऱ्या घटकांची लिस्ट तयार करा आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा.
 नकारात्मक घटकांपासून दूर राहा.
 अशा एखाद्या विश्वासू व्य्नतीशी मैत्री करा, जाे स्वभावाने चांगला आणि समाधानी असेल.
 दिवसभरात जेव्हा कधी मन इकडेतिकडे भटकू लागेल, तेव्हा आपले लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा.
 निसर्गाच्या जवळ जाऊन शांतीची अनुभव घ्या आणि त्यापासून प्रेरणा घ्या.