सौर कृषिपंप योजनेसाठी सव्वा लाख अर्ज

    01-Oct-2024
Total Views |
 
 
so
 
मुंबई, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांना अर्जासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू केलेल्या महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद मिळाला असून, केवळ चौदा दिवसांत 1 लाख 22 हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली आहे. त्यावर गेल्या 14 दिवसांत राज्यातील 1 लाख 22 हजार 421 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
 
जालना जिल्ह्याने यात बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून 52067 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर बीड (24526 अर्ज), परभणी (15043), छत्रपती संभाजीनगर (6888 अर्ज) आणि हिंगोली (5079 अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा.