जर तुम्ही ठरवलंत की वाईटच निवडायचे, तर तुम्हाला वाईट मिळतच जाईल.जीवनात भरपूर वाईट हजर आहे. अंधारच निवडायचा आपण ठरवीत असाल तर तर मग डाेळे झाकून आराम करीत पडून रहा नुसते.दिवसातच रात्र हुडका अन् ती मिळेलही. तिथंच वाईट शाेधायचे आहे तर वाईट मिळेल. दु:ख शाेधायचे आहे तर दु:ख मिळेल. पीडा शाेधायची असेल तर पीडा मिळेल. सैतान शाेधायचा असेल तर सैतान मिळेल. देव शाेधायचा असेल तर ताेही मिळेल. ताे अगदी हाताशीच असताे. जिथे सैतान उभा असताे तिथेच किंवा खरे म्हणजे इतकेही अंतर नाही. कदाचित सैतान दिसत आहे ताेही देवाच्या चेहऱ्याचं रूप चुकीच्या प्रकारानं पाहणं हेच कारण आहे.
ज्या माणसाला काट्यामध्ये उमललेले फूल दिसते, जाे म्हणताे धन्य आहे, अगाधलीला आहे, प्रभूचे रहस्य अद्भुत आहे. इत्नया काट्यांच्यामध्ये फूल उमलते म्हणजे आश्चर्य आहे. त्या माणसाला फारसे काटे दिसणार नाहीत. जाे इत्नया काट्यांमध्येही फूल पाहून घेताे ताे थाेड्याच दिवसात काटेही फुलांच्या मित्राच्या रूपात पाहू लागेल. ताे हेही उमजेल की काटे फुलांच्या रक्षणासाठी असतात. ताे शेवटी हेही उमजून राहील की काट्याविना फूल असूच शकत नाही.