गीतेच्या गाभाऱ्यात

05 Sep 2023 16:28:33
 
 
पत्र अठ्ठाविसावे
 
 
bhagvatgita
‘तसं पाहिलं तर माझ्याकडे पैसा आहे, राहण्यास चांगला फ्लॅट आहे, सुखसाेयी आहेत, घरात सैपाकाला बाई आहे.तुम्ही सेल्सटॅ्नस ट्रिब्यूनलचे मुख्य न्यायाधीश आहात, नाेकर चाकर आहेत. असं असूनही मला केव्हा केव्हा त्रास हाेताे.मनुष्य आजारी पडला तर डाॅ्नटर औषध देताे, पण मानसिक त्रासावर डाॅ्नटर काय औषध देणार? मला एकदा रामबाण उपाय सांगा, गीतामाऊली तुमच्यावर फार प्रेम करते. तिचा आशीर्वाद घेऊन मला चांगला मार्ग दाखवा.परवा मी ‘झाला महार पंढरीनाथ’ हा सिनेमा पाहिला.आज मानव चंद्रावर प्रत्यक्ष जाऊन आला. अशा या काळात बुद्धिवादाच्या चष्म्यातून दामाजीपंतांचे चरित्र मला सांगा.सिनेमात सारा भर अंधश्रद्धेवर तुम्ही तर अंधश्रद्धेच्या विरुद्ध.बुद्धिवादाच्या बैठकीवर दामाजीपंतांचें चरित्र मला सांगा. ते ऐकून माझे जीवन पुण्यमय हाेवाे. तुमचे वा्नय माझ्या डायरीत मी लिहून ठेवले आहे.
 
ऐका साधुसंतांचे जीवन। गीता म्हणे तेच करी पावन.आता तुम्ही मा कृपा करून दामाजीपंतांचे चरित्र थाेड्नयात सांगा. सांगाल ना? सांगाच’ हे पहा, तुझ्याप्रमाणे मला देखील केव्हा केव्हा मानसिक त्रास हाेताे. मानसिक त्रासाबद्दल तू खाेलवर विचार केलास तर तुला कळून येईल कीअमुक अमुक मनुष्य अमुक अमुक वेळेला आपल्याशी बराेबर वागला नाही, म्हणून आपण स्वत: त्रास करून घेताे.
मानसिक त्रासापैकी बराचसा भाग असल्या त्रासाने व्यापलेला असताे. लाेक कसे वागले, ते चांगले वागले नाहीत, त्यांनी आपणास कसा त्रास दिला या विचाराने आपले मन भरून जाते व आपण दु:खी हाेताे. लाेक कसे वागले, ते वाईट आहेत, असला विचार करण्यापेक्षा आपण कसे वागलाे, आपण कसे वागावे, आपले वागणे बराेबर आहे कां, गीतेच्या प्रकाशात आपल्याला चांगल्यातले चांगले जीवन घालवणेस पाहिजे म्हणजेच अंतरंगातील देवाचे दर्शन आपणाला घेता येईल- हा विचार आपण करावा म्हणजे- मानसिक त्रासाचा ऱ्हास हाेताे व दु:खाचा अंध:कार नाहीसा हाेऊन सुखाची पहाट सुरू हाेते.
 
या गाेष्टी आपल्या हातात नाहीत, त्याबद्दल विचार करून आपण उगीच दु:खी हाेताे. तू असे लक्षात घे कीआपले जीवन थाेडे आहे. आपणाला खूप मार्ग आक्रमावयाचा आहे. मन दु:खाने भरले म्हणजे पाय पांगुळतात व चालताना जीव नकाेसा हाेताे. गीतेच्या प्रकाशांत आपणाला खूप अंतर चालावयाचे आहे. तू ऊठ, मनातून साऱ्या दु:खी विचारांना हाकलून दे. देवाच्या विचाराने मन काठाेकाठ भरून जाऊ दे. तुला एकदम हुशारी येईल. तुझ्या पायात हत्तीचे बळ येईल.कृष्णाचे नाव घेऊन गीतेच्या प्रकाशात आपण हातात हात घालून मार्ग आक्रमूया. तुला वाटू लागेलकृष्णच आहे आपणाला आधार। ताे करी साऱ्या दु:खाचा परिहार। तुला दामाजीपंतांचे चरित्र ऐकावयाचे आहे. ऐक- आपण सांगलीचे - सांगली संस्थानाचा मंगळवेढे हा एक तालुका.
Powered By Sangraha 9.0