आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परि ताे अभिप्राय नाेहे । श्रीहरीचा ।। 15.115

04 Sep 2023 15:18:30
 
 
 

saint 
 
 
संसारवृक्षाचे आणखी वर्णन ज्ञानेश्वर महाराज करीत आहेत. मायेपासून महत्तत्त्व हीच काय ती उमललेली काेवळी लुसलुशीत पालवी प्रकट हाेते.त्या पालवीस सत्त्व, रज, तम असे तीन अहंकार निर्माण हाेतात. हा त्रिगुणात्मक अहंकार म्हणजे पानांचा खालचा शेंडा आहे.यापासूनच टवटवीत अशी मनाची डहाळी वाढू लागते.मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या ांद्या त्रिगुणात्मक अहंकारास ुटतात.तामस अहंकारापासून आकाश, वायू, तेज, उदक, पृथ्वी ही पंचमहाभूते ुटतात. पाच ज्ञानेंद्रिये ही लुसलुशीत पाने हाेत. शरीरातील त्वचेच्या इंद्रियांचे वेद हाेतात. आणखीही पुष्कळ समृद्धी हाेते. जिव्हेला इच्छा निर्माण हाेते. गंधविषयाचा अंकुर ुटला की, नाकाचा शेंडा तरतरीत हाेताे. असा हा संसारवृक्ष अधिक वाढला तरी ब्रह्मापेक्षा माेठा हाेत नाही.
 
शिंपीवर (शिंपल्यावर) असलेले रूप हे शिंपीएवढेच भासते. समुद्राचा विस्तार त्याच्या लाटांवरून दिसताे. त्याप्रमाणे ब्रह्म विस्तार पावून सर्वत्र पसरते; पण हे वर्णन राहू दे.ज्ञाते पुरुष या संसारवृक्षाला अश्वत्थ असे म्हणतात. श्व म्हणजे उद्या. ताेपर्यंत हा प्रपंचवृक्ष एकसारखा रहात नसल्यामुळे त्याला अश्वत्थ हे नाव आहे. एका क्षणात मेघाचे रंग बदलतात किंवा वीज क्षणभरात नाहीशी हाेते.हलणाऱ्या कमळाच्या पानांवर पाण्याच्या थेंबाला स्थिरता नसते, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची स्थिती आहे. ताे प्रतिक्षणाला नाश पावत असताे, म्हणून ज्ञाते लाेक त्याला अश्वत्थ असे म्हणतात. अश्वत्थ म्हणजे पिंपळ खरा; पण भगवंतांच्या मनात हा अभिप्राय नाही. या वृक्षास केवळ क्षणभंगुरतेच्या दृष्टीने अश्वत्थ म्हटले आहे. याच्या अविनाशीपणाबद्दल माेठी प्रसिद्धी आहे.
Powered By Sangraha 9.0