दाेन भांडखाेर शेजाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यांना राग कमी करण्यासाठी झाडे लावण्याची आगळी-वेगळी शिक्षा सुनावली असून, खटला निकाली काढला आहे. या दाेन शेजाऱ्यांना प्रत्येकी 200 झाडे लावायची आहेत. बागकाम ताणमुक्त करते असे मानले जाते. यामुळे न्यायालयाने हे निर्देश दिले आहे.न्यायमूर्ती शर्मा म्हणाले की, दाेन्ही शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या आसपास झाडांची प्रत्येकी 200 राेपटी लावून त्यांची वाढ सुरू हाेईपर्यंत त्यांना त्यांचे संगाेपन करावे लागणार आहे. उद्यान अधिकाऱ्यांनी ठरविलेल्या जागेत ही झाडे लावावी लागतील.
अधिकाऱ्यांनी या संदर्भात नाेव्हेंबर 2023पर्यंत अहवाल सादर करावा असाही न्यायाधीशांनी आदेश दिला आहे. किरकाेळ कारणाने भांडण करणे ही नकारात्मक ऊर्जा आहे. त्यामुळे दाेन्ही शेजाऱ्यांनी झाडांची राेपटी लावून त्यांचे पाच वर्षे संगाेपन सुद्धा करायचे आहे. या संदर्भात दाेघांत जानेवारीमध्ये समेट घडला. पण आता ते एफआयआर रद्द करण्यासाठी आले व भांडू लागले. या दाेन शेजाऱ्यांवर इजा करणे, घरात घुसणे, धमकी देणे आदी आराेप हाेते. हा खटला मार्च 2017 मध्ये दाखल झाला हाेता. एका राजकीय पक्षाकडून घाेंगडी घेण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला हाेता.