भगवंताचे प्रेम जाेडायचे असेल, तर नाम साेडू नका

21 Sep 2023 08:42:32
 
 

Gondvalekar 
 
संकल्प ही ार माेठी शंक्ती आहे. इच्छा जर खराेखर अती प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही.तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटताे. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावत:च अपूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती हाेऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपाेआप नाहीशा हाेतात. म्हणून नेहमी ‘भगवंत मला हवा’ अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे म्हणजे ‘तू मला हवास’ असे म्हणणेच हाेय.खऱ्या प्रमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर ताे नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गाेष्टी घडवून आणतसे. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालताे ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे.
 
विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त हाेऊनही ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, ते करीतच असते. म्हणून कशाकरतां का हाेईना, नाम घ्या. पण निविृषय हाेण्याकरता घेतले तर काम शीघ्र हाेईल. साधन तेच आणि साध्यही तेच.नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही, यापरते दुसरे साधन नाही, असा दृढभाव असावा. आपण काेणतेही कृत्य करीत असतांना, ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डाेळ्यासमाेर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण ते कशाकरता घेताे त्याची जाणीव अखंड असावी.ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे जाणणे, याचे नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहाे, पण भ्रमाने मला ‘मी विषयाचा आहे’ असे वाटू लागले.
 
संत ‘तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहे,’ असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी, आणि याकरता ते नाम सांगतात. नाम घेणे म्हणजे ‘मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे.’ असे मनाला सांगणे, मनात, तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन:पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे.भगवंत खराेखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लाैकिक, पैसा, विषय इत्यादी काही नकाे असे वाटते का? तसे नसेल तर ‘भगवंत मला हवा आहे’ असे नुसते ताेंडाने म्हणणे बराेबर नाही.ज्याला भगवंताचे प्रेम जाेडायचे असेल त्याने जगाचा नाद साेडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन हाेऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.
Powered By Sangraha 9.0