तरुणसागरजी

21 Sep 2023 08:44:13
 
 

Tarunsagarji 
 
आपल्या आयुष्यातून आज ‘हसणं’ हे असं काही निघून गेलंय की, निवडणूक हरल्यानंतर जसा एखादा नेता गायब हाेताे.आराेग्यासाठी जितकं हसणं जरुरीचं आहे, तितकंच रडणंही ! ते डाेळे तरी काय, ज्यांतून कधी अश्रू ढळले नाहीत आणि ताे चेहराच काय ज्यावर कधी हास्यरेषा उमटली नाही.आपलं हृदय, मेंदू म्हणूनच जड झालंय. कारण आपण हसणं आणि रडणं बंदच करून टाकलंय.हसायला आलं तर हसा, त्यामुळे पाेटातली आतडी खुलतील, माेकळी हाेतील आणि रडायला आलं तर जरूर रडा.
Powered By Sangraha 9.0