याकारणे उत्तम गुण। तेचि भाग्याचे लक्षण ।।1।।

07 Aug 2023 15:27:59
 
 
 
 
saint
प्रपंच आणि परमार्थ या दाेन्हींकडे मार्गदर्शन हेच श्रीसमर्थांचे वैशिष्ट्य आहे. नवव्या दशकातील ‘‘जाणपण निरूपण’’ या चवथ्या समासामध्ये बुद्धी, विद्या, विवेक, प्रयत्न या सर्व गुणांचे प्रपंचात आणि परमार्थात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे त्यांनी विशद केले आहे. या समासाचाही प्रारंभ श्राेत्यांच्या प्रश्नाने हाेताे. जगाच्या पाठीवर जे असंख्य लाेक आहेत त्यातील काही श्रीमंत तर काही भिकारी, काही निर्मळ तर काही ओंगळ, काही उत्तम तर काही अधम, अशी त्यांच्यात माेठी विषमता आढळते. त्याचे कारण म ला सांगावे अशी श्राेते कळकळीने विनवणी करतात. या सर्व परिस्थितींचे मूळ माणसाच्या गुणांमध्ये आहे. सद्गुणी असतात ते यशस्वी हाेतात आणि दुर्गुणी अपयशी ठरतात हेच या विषमतेमागील मुख्य कारण आहे.
 
आपला जाे व्यवसाय असेल ताे जाणतेपणाने केला, तर आपाेआपच ताे यशस्वी हाेऊन समाजात मान्यता पावताे.श्रीसमर्थांना ‘‘कार्यकर्ता’’ हा शब्द अतिशय प्रिय आहे. समजून, उमजून पूर्ण क्षमतेने पण निर्लाेभीपणाने आणि दृढपणे हातातील काेणतेही काम करणाऱ्याला ते कार्यकर्ता या विशेषणाने गाैरवितात. सध्याच्या काळात कार्यकर्ता हा शब्द ‘‘काय बी कर्ता’’ या अर्थाने कुचेष्टेने वापरला जाताे आणि राजकीय झुंडशाही बघता ताे सर्वांना याेग्यही वाटताे. परंतु श्रीसमर्थांचा ‘कार्यकर्ता’ हा आदराचे स्थान असताे हे लक्षात घेतले पाहिजे.सर्व वडीलधारी माणसे आपली विद्या तू शिकला नाहीस तर भीक मागायची पाळी येईल म्हणून ती नीट शीक असे सांगतात ते यथार्थ आह
Powered By Sangraha 9.0