जास्त जेवल्याने जे सुख हाेते ते हे सुख नाहीये. खरे सांगायचे म्हणजे जास्त जेवल्याने दु:खच मिळतं. रात्रभर जागून सिनेमा पाहिल्यानं जे सुख मिळते ते हे सुख नव्हे. असल्या जागरणाने फक्त दु:खच मिळते.पण हे जे सुख आहे ते संतुलनाचे सुख असते.याेग्यवेळी आपल्या गरजेनुसार अनुकूल जेवण याेग्य वेळी आपल्या गरजेनुसार अनुकूल निद्रा, याेग्यवेळी आपल्या गरजेप्रमाणे अनुकूल स्नान- ही सगळी याेग्य दिनचर्या हाेय.सम्यक चर्येने सुखाची एक आंतरिक भावदशा हाेते. ही एक आगळीच गाेष्ट आहे.हाे सुख आहे बऱ्याच गाेष्टींच्या संदर्भात.
अन् ही उत्तेजनेची अवस्था नाहीये. ती फक्त आंतरिक शांतीची अवस्था आहे. त्या शांतीच्या अवस्थेतच व्यक्ती ध्यानात सरळपणे प्रवेश करू शकते. याेगासाठी हे अनिवार्य आहे. म्हणून आपली चर्या आपण पारखून तयार ठेवीत राहिलं पाहिजे. काेणत्यातरी शास्त्रानुसार नाही तर आपल्या प्रकृतीनुसार. अन् जग काय वाटेल ते म्हणेल, त्याची अजिबात पर्वा करता कामा नये.फक्त एका गाेष्टीची पर्वा करायची - आपले शरीर आपणास बराेबर सुखवार्ता देत आहे काय? हाेय- तर मग आपण याेग्य ते जीवन जगता आहात. आपले शरीर दु:खवार्ता देत आहे काय? हाेय- तर मग आपण चुकीचे जीवन जगता आहात. ही सुख-दु:खे आपणाला अशी माेजपट्टीसारखी वापरता येतील.