आत्म्यास नाही आत्मपण । हेचि नि:संगाचे लक्षण ।।1।।

04 Aug 2023 18:02:10
 
 

saint 
 
स्वरूप हे शब्दांच्या पलिकडे असल्याने अन्वय आणि व्यतिरेक या शब्दार्थावर आधारित तर्कशास्त्राच्या पद्धती ते जाणण्यासाठी उपयाेगी पडत नाही. ज्ञानसंपादनाची सुरुवात शब्दांपासून हाेते हे खरे असले तरी शब्दार्थ ही पहिली पायरी आहे. शब्दांपासून येणाऱ्या ज्ञानाला श्रीसमर्थ वाच्यांश म्हणतात. त्यापुढील पायरी म्हणजे त्या वाच्यांशातून मिळालेल्या ज्ञानाची बुद्धीपूर्वक चिकित्सा करून त्यातून प्रतीत हाेणारी कल्पना जाणून घ्यावयाची. या ज्ञानाच्या दुसऱ्या पायरीला लक्ष्यांश असे संबाेधून श्रीसमर्थ सांगतात की, लक्ष्यांश समजला की, वाच्यांशाची म्हणजे शब्दांची उपयुक्तता संपून जाते.सर्वब्रह्म आणि विमलब्रह्म असे ब्रह्मज्ञानाचे दाेन वेगवेगळे पक्ष काही ज्ञानी मंडळीच मानतात.
 
पण खरतर वाच्यांशामुळे हे दाेन पक्ष वेगवेगळे आहेत असे वाटते. परंतु लक्ष्यांश साध्य झाला की, त्यांच्यांतील वेगळेपण ज्याला श्रीसमर्थ ‘‘पक्षपात’’ असा यथार्थ शब्द वापरतात, ताे नाहीसा हाेताे.स्वरूपानुभवामध्ये शब्दांचे महत्त्व नसून ताे लक्ष्यांशावर ध्यान देऊन अनुभवायचा असताे.ताे मुळातच पैलपार असल्याने ताे मिळाल्यावर शब्दांची खूण संपून जाते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारीही प्रकारांच्या वाणीसुद्धा त्या अनुभवाशी नि:शब्द हाेतात. तेव्हा तेथे शब्दसंभाराचे कार्यच उरत नाही आणि शाब्दिक कलाकुसर व काेटीक्रम लटके पडतात. उच्चार केला जाणारा शब्द लगेचच हवेमध्ये नष्ट हाेणारा असा नाशवंत आहे हे आपण राेज अनुभवताेच.
Powered By Sangraha 9.0