तरी स्वधर्मु एक आहे । ताे सर्वथा त्याज्य नाेहे। मग तरिजेल काइ पाहें । कृपाळूपणें ।। (2.182)

04 Aug 2023 17:51:54
 
 

Dyaneshwari 
 
आत्मतत्त्वाचे खरे स्वरूप अर्जुनाला श्रीकृष्णांनी समजावून सांगितले. या आत्मप्राप्तीची इच्छा विरक्त पुरुष वैराग्य धारण करून करतात. माेठेमाेठे मुनी ब्रह्मचर्यादि व्रते आजन्म आचरतात.आत्मस्वरूपाचे दर्शन झाल्यावर कित्येकजण संसाराचे भान विसरतात आत्मस्वरूपाची स्थिती गुरुमुखाने ऐकल्यावर काहींचे देहभान हारपते. ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, पुन्हा मागे परत वळत नाहीत, त्याप्रमाणे परमात्म्याचा शाेध घेणारे याेगी परमात्म्याशी एकरूप हाेतात. त्यांना पुन्हा जन्ममरणांची परंपरा असत नाही.असे आत्मज्ञानाचे स्वरूप समजावून सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की,‘अर्जुना, एकमात्र चैतन्य सर्व देहास व्यापून असते. शरीराचा घात झाला तरी ते नष्ट हाेत नाही. या चैतन्यामुळेच ही सृष्टी निर्माण हाेते व नाश पावते. मग तू शाेककशाचा करणार आहेस? अर्जुना, एवढी साधी गाेष्ट तुला कशी कळत नाही?
 
अनेक दृष्टींनी पाहिले तरी तुझे शाेक करणे याेग्य नाही. ‘अर्जुना, आपण या युद्धाच्या प्रसंगी शाेक करीत काय बसलाे आहाेत? युद्ध न करण्याचे विचार आपल्या मनात कसे आले हे तुला अजून कसे लक्षात येत नाही? अरे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्मच आहे.तुझाच घात हाेण्याचा संभव असला किंवा काैरवांचे काहीही झाले किंवा सृष्टीचा प्रलय झाला तरी जाे स्वधर्म आहे ताे केव्हाही व कसल्याही प्रसंगी साेडता येणार नाही. शत्रूवर दया दाखवून आपण त्याच्यावर उपकार केला तर ताे धर्म हाेणार नाही. या युद्धात स्वजनांचा नाश पाहून तुझ्या चित्ताला दयेचा पाझर ुटला तरी धर्मयुद्ध करीत असताना हे तुझे वागणे उचित हाेणार नाही. दूध गाईचे झाले तरी ते नवज्वरात पथ्यकर नसते.त्याप्रमाणे स्वधर्म साेडून परधर्माचे अनुकरण कल्याणकारक हाेत नाही. तरी तू सावध रहा.’
Powered By Sangraha 9.0