जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, सामाजिक विषयाशी निगडित जुन्या वास्तू व ठिकाणांची शासन स्तरावरून विविध कामांतून दुरुस्ती, डागडुजी सुरू आहे. पूर्वीच्या आहे त्या स्थितीत काेणताही आधुनिकपणा न आणता जुन्या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेले, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले काेल्हापूर पुन्हा एकदा त्याचप्रकारे येत्या काळात उभे करणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.मंदिर परिसरातील भवानी मंडपातील हुजूरपागा इमारतीत उभारण्यात आलेले स्वच्छतागृह व दक्षिण दरवाजानजीक वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या चप्पल स्टँड सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर केसरकर बाेलत हाेते.यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संताेष पाटील आदी उपस्थित हाेते.
गर्दीचे दिवस वगळून मंगळवारपासून भाविकांना गाभाऱ्यातून श्री महालक्ष्मीचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगून केसरकर म्हणाले, की मंदिर परिसरातील कामांची ही फ्नत सुरुवात असून, येत्या काळात भूमिगत विद्युत वाहिन्या; तसेच दर्शन रांगा व वाहनतळहीभूमिगत केले जाईल. मंदिर परिसरातील माहिती केंद्र पागा इमारतीत हलवले जाईल. श्रीमंत शाहू महाराजांच्या सूचना घेऊन पुरातत्त्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून, पूर्वीचा मंदिर परिसर उभा केला जाईल. पागा इमारतीत सुविधा निर्माण करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद नियु्नत केले आहेत.येत्या काळात काेल्हापूरला निश्चितच चांगली झळाळी प्राप्त हाेईल.यावेळी केसरकर, श्रीमंत शाहू महाराज, खासदार मंडलिक, जिल्हाधिकारी रेखावार आदी मान्यवरांनी साेबत श्री महालक्ष्मी, अतिबलेश्वर, छत्रपती शाहू महाराज राजमहालातील श्री तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मंदिर परिसर व भवानी मंडपाची पाहणी केली.