पर्यटनासाठी प्रसिद्ध जाेग फाॅल्स

    03-Aug-2023
Total Views |
 
 
 

tourism 
भारतात अशा अनेक जागा आहेत, ज्यांच्यापुढे परदेशातील ठिकाणेही कमी पडतात. त्यापैकीच एक आहे जाेग फाॅल्स. ताे कर्नाटकात आहे. माॅन्सूनमध्ये त्याचे साैंदर्य दुप्पट हाेते. या प्रसिद्ध ठिकाणाविषयी जाणून घेऊया. जाेग फाॅल्स किंवा धबधबा कर्नाटकच्या शिमाेगा जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या धबधब्याचे पाणी काेसळताना अतिशय आकर्षक दिसते. ते पाणी शरावती नदीला जाऊन मिळते.धबधब्यातून काेसळणाऱ्या पाण्याशिवाय इथले डाेंगर हिरवळीने भरलेले आहेत. ही हिरवळ धबधब्याच्या साैंदर्यात भर घालण्याचे काम करतात. माॅन्सूनमध्ये या धबधब्याचे साैंदर्य आणखी वाढते.जाेग फाॅल्स शिवाय तुम्ही इथल्या अनेक दुसऱ्या जागांवरही फिरण्यासाठी जाऊ शकता. त्यामध्ये डब्बे फाॅल्स, लिंगनम्नकी बंधारा, तुंगा एनीकट बंधारा पाहण्यासाठी जाऊ शकता.या वाॅटरफाॅलच्या आजूबाजूला अनेक रेस्टाॅरंट्स आहेत. तिथे तुम्हाला व्हेज आणि नाॅनव्हेज दाेन्ही प्रकारचे पदार्थ मिळू शकतील. पण स्वत:चे जेवण घेऊन जाणे हा चांगला पर्याय आहे.