ओशाे - गीता-दर्शन

03 Aug 2023 19:30:07
 
 

Osho 
 
पण, आपली सगळी व्यवस्था अशी आहे की ती अव्यवस्थितता व्यवस्थितपणे रुजवते.आपली व्यवस्था काय आहे? सगळ्यांनी इत्नया वाजता जेवायला पाहिजे.सगळ्यांनी याच वेळी फिरायला जायला पाहिजे, सगळ्यांनी एका वेळी घरी परतलं पाहिजे. आपली सर्व व्यवस्था व्यक्ती समाेर ठेवून नाही करण्यात आलेली. आपली सर्व व्यवस्था सरासरी समाेर ठेवून रचण्यात आलेली आहे. परंतु, यामुळे फायदा फारसा हाेत नसताे. भयंकर नुकसान हाेते.अन् आपण फायदे नुकसान यांची तुलना केली, तर नुकसानाचे पारडे फारच जड असते.अमेरिकेतल्या बक मिलर नावाच्या विचारवंताने आयुष्यभरच्या संशाेधनानंतर विचारांती एक सूचना केली आहे.
 
त्याची सूचना अशी आहे की, सगळ्या शाळा एकाच वेळी उघडल्या जाऊ नयेत. शाळेत येणारी जी मुले आहेत ती किती वाजता उठतात यावर शाळा किती वाजता उघडायची हे ठरवले गेले पाहिजे.त्याप्रमाणे मुलांनी आपले नाव त्या त्या शाळेत घातले पाहिजे. गावात कित्येक प्रकारच्या शाळा असल्या पाहिजेत. सगळ्याच हाॅटेल्समध्ये लाेकांनी जेवणासाठी गर्दी इत्नया वाजता करावी हे उचित नाहीये. सर्व लाेकांची जेवणाची वेळ त्या त्या व्यक्तीच्या आंतरिक गरजेवरून ठरली पाहिजे. अन् त्याचे फायदेही खूप हाेतील.सगळ्याच ऑफिसांच्या वेळा एकच असण्याची काहीही गरज नाही. याचे माेठे फायदे हाेतील. एक तर हा असेल की सकाळी अकरा वाजता जाे ट्रॅफिक जाम हाेत असताे ताे टळेल. आता जित्नया बसेस लागतात त्याच्या एकतृतीयांशच बसेस लागतील.
Powered By Sangraha 9.0