गीतेच्या गाभाऱ्यात

29 Aug 2023 15:27:49
 
 
पत्र अठ्ठाविसावे
 

Bhagvatgita 
सनातन म्हणजे पुरातन नव्हे तर सदा नूतन कामाबद्दल निरनिराळे विचार पाहून मी भांबावून गेले आहे. गीतेच्या गाभाऱ्यात या विषयावर तुम्ही चांगला प्रकाश टाकला तर बरे हाेईल.’ गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कामाला ‘वैरी’ असे म्हटले आहे.गीतेच्या सातव्या अध्ययात भगवान म्हणतात. धर्माच्या विरुद्ध नसणारा काम मी आहे.गीता वाचून तुला कळून येईल कीकामाला ठार मारण्याचे नसून त्याला नीतिनियमांनी बांधून ठेवण्याचे आहे.काम संयमाने शाेभताे. स्वैराचाराने घात करताे. आपण कामाचे हाेणेचे नाही, काम आपला दास झाला पाहिजे. काम सुखकर नाेकर आहे. पण, घातक मालक आहे.आता एक नवा विचारप्रवाह सुरू झाला आहे. कितीतरी तज्ज्ञ या प्रवाहाला साथ देत आहेत. त्यांचे म्हणणे असे की - संयम शारीरिक व मानसिक प्रकृतीला घातक आहे.स्वैराचार हाच खरा उपचार.
 
व्यभिचार शिक्षापात्र असता कामा नये. मु्नतसंभाेग हे आजच्या काळाचे परवलीचे शब्द आहेत. कामवासना ही खरीखुरी नैसर्गिक वासना असून त्या बाबतीत संयम पाळणे ही गाेष्ट कालबाह्य आहे. विवाहबंधन हे कृत्रिम बंधन आहे. ज्यांना परस्परांविषयी आकर्षण आहे त्या स्त्रीपुरुषांना समागमाचा ह्नक असलाच पाहिजे.या नवीन विचारांचा प्रवाह जाेरात सुरू झाल्यामुळे Bedseller वाङ्मय Best seler झाले आहे.शिकागाे शहरातील मुलींच्या शाळांची तपासणी करता असे आढळले की - 13 ते 18 वयाच्या अविवाहित मुलींपैकी चाेवीस हजार मुलींना दिवस गेले हाेते.संतती प्रतिबंधक गाेळ्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असताना ‘‘पिल साेसायटी’’ मध्ये देखील अमेरिकेत अनाैरस संतती लाखाने जन्माला येत आहे.
 
हिप्पी पंथामध्ये कमालीचा स्वैराचार आहे; पण हा स्वैराचार हिप्पी पंथापुरताच मर्यादित राहिला नसून ताे अमेरिकेत व पाश्चिमात्य देशांत पसरू लागला आहे. विद्यार्थिनींची मागणी अशी आहे कीवसतिगृहातील खाेलीमध्ये आमच्याबराेबर रात्री आमच्या इेू षीळशपवी ना राहण्यास बंदी करणे म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर अक्षम्य घाला घालण्याप्रमाणे आहे. सबब ही बंदी नाहीशी केली पाहिजे.हा सारा प्रकार पाहून काही विचारवंत त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाेराचा आवाज उठवत आहेत. डाॅ. डॅनिएल शुगरमन, डाॅ. मेरी काल्डेराेन, डाॅ. अले्नझांडर लाेवेन अशासारखे विचारवंत लाेकांना बजावत आहेत की- मु्नत समागमाने जी मानसिक हानी हाेते ती पुढे भरून येत नाही.पिटिरिम् साेराेकिन याने असा धाे्नयाचा इशारा दिला आहे की -
Powered By Sangraha 9.0