सद्गुरूची कामगिरी काेणती ?

28 Aug 2023 18:03:46
 
 
 

saint 
ते काेणता मार्ग दाखवतात?सद्गुरूची कामगिरी काेणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात.स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, ताेच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्गुरू जागे करण्याचे काम करतात.मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खराेखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ ‘मी स्वस्थ आहे’ असे म्हणताे, पण ते काही खरे नाही. मन जाेवर गिरक्या मारते ताेपर्यंत ताे स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार.शिष्याच्या भावनाच गुरूला गुरूपद देतात. जाे शरण जाताे त्याचा कार्यभाग सद्गुरू उचलताे. ज्याची दृष्टी रामरूप झाली ताे खरा गुरू.
 
जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खराेखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच हाेय. गुरूने सांगितलेले अक्षरश: पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत.संतांना भगवंताचा जाे ध्यास असताे ताे महत्त्वाचा आहे.पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जाे व्हायला पाहिजे ताायदा हाेत नाही. आपली जी कर्तव्यें ठरली आहेत ती आपण बराेबर करावीत. व्यापार थाेडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढताे, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपाेआप सुटेल.आपले कर्तव्य काेणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले ‘हवे’ पण कमी हाेईल.
 
मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागते. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येते. पण हे सगळे हाेण्यासाठी आपल्या अंत:करणाची शुद्धता हा पाया आहे. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल; केवळ ‘गाडी माझी आहे’ म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही.साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही.आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालविताे, आणि खड्ड्यामध्ये पडताे.सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला याेग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धाेका उरणार नाही.
Powered By Sangraha 9.0