काेणतीही उपमा न जुळणारे, कशावरही अवलंबून नसणारे व काेणती अपेक्षा नसणारे असे ते परब्रह्म निराेपम्य, निरालंब व निरापेक्षा आहे.ते निरंजन म्हणजे सर्व प्राणी व माणसांपासून मुक्त निरंतर म्हणजे सलग सर्वव्यापी आणि निर्गुण म्हणजे गुणाशिवायचे आहे. आसक्ती अभिलाषा नसलेले नि:संग, मलविरहित असे निर्मळ आणि जे कधीही स्वस्थान साेडत नाही असे ते निश्चळ आहे.परब्रह्म शब्दविरहित, दाेष नसलेले, वृत्ती नसलेले असे नि:शब्द, निर्मण व निश्चळ आहे. ते नि:काम, निर्लेप व नि:कर्म म्हणजे इच्छा नसलेले, कशानेही लिप्त न हाेणारे आणि कर्मविरहित आहे. त्याला नाव नाही, जन्म नाही आणि ते डाेळ्यांना प्रयत्न दिसू न शकणारे असे अनाम्य, अजन्मा आणि अप्रत्यक्ष आहे. ते अगणित म्हणजे माेजमापात न बसणारे, अकर्तव्य म्हणजे न्यायनीतीहून श्रेष्ठ आणि अक्षै म्हणजे काेणतीही क्षिती, क्षय नसणारे आहे. त्याला रूप नाही म्हणून ते अरूप, त्याचे मनाला ज्ञान हाेत नाही, ते लक्षात येत नाही म्हणून अलक्ष आणि कधीही शेवट न हाेणारे असे अमर म्हणून अनंत आहे.
ते अपार म्हणजे पैलतीर न दिसणारे अमर्याद, अढळ म्हणजे कधीही न ढळणारे, न भ्रष्ट हाेणारे आणि अतर्क्य म्हणजे सामान्य तर्कामध्ये न सामावू शकणारे आहे. ते अद्वैत म्हणजे भेदाभेदविरहित, अदृश्य म्हणजे इंद्रियांना न दिसणारे आणि अच्युत म्हणजे आपल्या उच्च स्थानावरून कधीही न घसरणारे आहे.शेवटचा प्रश्न भगवद्गीतेतील नैनं छिन्दंती शस्त्राणि या श्लाेकाची खूण सांगणारा आहे. परब्रह्म अछेद, अदाह्य आणि अक्लेद म्हणजेच शस्त्रांनी न ताेडता येणारे, अग्नीनेही न जळणारे आणि पाण्यानेही न भिजणारे आहे, असे त्याचे उत्तर सांगून या समासाची समाप्ती करताना तेपरब्रह्म म्हणिजे सकळांपरते । तयांस पाहातां आपणाच ते । हे कळे अनुभवमतें । सद्गुरू केलिया ।।29।।या ओवीने करून सांगतात की, परब्रह्म दृश्य जगातील काेणत्याही वस्तूसारखे नसून ते सद्गुरूच्या कृपेनेच अनुभवता येते आणि हा अनुभव जेव्हा पूर्णांशाने येताे तेव्हा आपणच त्या परब्रह्माशी एकरूप हाेऊन सर्व प्रश्नच विरून जातात व परमानंद प्राप्त हाेताे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299ओशाे - गीता-दर्शन