ओशाे - गीता-दर्शन

02 Aug 2023 02:25:27
 
 
 

Osho 
जेव्हा मुले म्हणतात भूक लागली तेव्हा आईचा नट्टापट्टा चालू असताे. यामुळे आपले भाेजन आपली निद्रा, आपले जागरण, आपल्या जीवनाची सारी चर्याच अतिरेकांमध्ये डाेलत असते. समत्वच हरवून बसते.सर्व नियम सरासरीतून निघतात. त्यामुळे चुकीचे असतात. दुसरी गाेष्ट प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते.याचा संबंध फक्त वयाशीच आहे असे नाही. एकाच वयाच्या दहा मुलांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. एकाच वयाच्या दहा वृद्धांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. एकाच वयाच्या दहा तरुणांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात.जे जे नियम बनवले जातात ते अ‍ॅव्हरेजवर बनवले जातात. जे जे नियम बनवले जातात ते सरासरीवर आधारित असतात. उदाहरणार्थ- असे म्हटले जाते की प्रत्येक माणसाला कमीत कमी सात तास झाेपेची जरूरी आहे.पण काेणत्या माणसाला? हे काेणत्याही एका विशिष्ठ माणसासाठी नाही म्हटलेले. जगातल्या सर्व माणसांच्या झाेपेचे एकूण तास भागिले माणसांची संख्या बराेबर सात. असा साताचा अ‍ॅव्हरेज आहे. सरासरी सात.
Powered By Sangraha 9.0