गीतेच्या गाभाऱ्यात

02 Aug 2023 02:20:09
 
 

Bhagvatgita 
 
पत्र पंचविसावे शेवटी धर्मराजाने संजयाबराेबर उद्याेगपर्वाच्या एकतिसाव्या अध्यायात दुर्याेधनाला निराेप पाठवला की, ‘‘आमचे वनवासात खूप हाल झाले. आता तरी आमचा याेग्य वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. याकरिता दुर्याेधना तू अधाशीपणा साेडून दे.... शेवटी मी तुला सांगताे की आम्ही पाच भाऊ आहाेत. निम्मे राज्य राहू दे. आम्हाला पाच गावे दिलीस तरी चालेल व युद्ध हाेणार नाही. अविस्थल, वृक्षस्थल, माकंदी, वारणावती ही चार व तुला वाटेल ते पाचवे अशी पाच गावे आम्हाला दे. कारण माझी इच्छा आहे की युद्ध न हाेता आपण शम करावा.’’ धर्मराजाचा निराेप घेऊन संजय तिकडे गेला व इकडे कृष्णाने पांडवांचा विचार ऐकून घेतला व ताे शिष्टाई करण्यासाठी निघाला.
 
कृष्णाला माहित हाेते की दुर्याेधन आपसात तडजाेड करणेस तयार हाेणार नाही. कृष्णाने तसे बाेलूनही दाखवले पण ताे म्हणाला.
‘शम हाेण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणे उचित आहे’ कृष्ण शिष्टाईसाठी निघाला. त्याचेबराेबर हत्यारबंद दहा महारथी, एक हजार पायदळ, एक हजार स्वार व शेकडाे सेवक व विपुल अन्नसामग्री हाेती.कृष्ण म्हणाला हाेता कीआपण जरी दूत म्हणून जात असलाे तरी बेसावध असता कामा नये. काेणत्याही प्रसंगाला ताेंड देण्यास सज्ज असले पाहिजे.वाटेत जिकडे तिकडे कृष्णाचा न भूताे न भविष्यति असा सत्कार हाेत हाेता. लाेकांचे थवेच्या थवे वाटेवर येऊन कृष्णाची मार्गप्रतीक्षा करत व त्याचे दर्शन घेऊन स्वत:ला धन्य मानीत.धृतराष्ट्र विदुराला म्हणाला- ‘‘कृष्ण फार माेठा आहे. त्याला मी खूप माेठा नजराणा देऊन संतुष्ट करणार आहे’’ तू असे लक्षात घे कीकांही लाेकांना मनाची लाज नसते, पण जनाची लाज असते.
 
धृतराष्ट्र हा अशा लाेकांपैकी आहे. दुसरे काही लाेक असे असतात की त्यांना जनाची लाज असत नाही. पण मनाची लाज असते. विदुर हा अशा लाेकांपैकी आहे. तिसरे काही लाेक असे असतात की त्यांना जनाची लाज असत नाही व मनाचीही लाज असत नाही. दुर्याेधन हा अशा लाेकांपैकी आहे. चवथे काही लाेक असतात की त्यांना जनाची लाज असते व मनाचीही लाज असते. धर्मराज हा अशा लाेकांपैकी आहे.धृतराष्ट्राचे भाषण ऐकून विदुर त्याला म्हणाला.‘राजा! तू कृष्णाचा माेठा सत्कार करणार आहेस, पण हा सत्कार कपटाचा आहे. पांडव पाचच गावे मागत आहेत, पण ती त्यांना देऊन तुला त्यांच्याशी सख्य करायचे नाही.
 
द्रव्याची लालूच दाखवून कृष्णाला पांडवांपासून फाेडावा हा तुझा पाेटातला डाव आहे. पण राजा मी तुला सांगताे कृष्ण फार निराळा आहे.ताे तुझ्याकडून पाय धुण्याकरिता लाेटाभर पाणी याशिवाय दुसरे काहीही घेणार नाही.’’ कृष्ण हस्तिनापुरात आला तेव्हा सारे शहर त्याच्या सन्मानार्थ लाेटले. त्याची उतरण्याची व्यवस्था केली गेली हाेती पण कृष्ण काेठेही न जाता थेट विदुराचे घरी मु्नकामास गेला.विदुराच्या घरी कृष्णाला पाहिल्यावर कुंती डाेळ्यात अश्रू आणून त्याला म्हणाली.‘‘कृष्णा, युधिष्ठिराला सांग की तुझा क्षात्रधर्म कमी पडत चालला आहे. आता तरी हे खूळ पुरे कर. भीम व अर्जुन यांना सांग की क्षत्रिय स्त्री ज्या कारणासाठी पुत्रांना जन्म देते ताे समय जवळ आला आहे.
Powered By Sangraha 9.0