ओशाे - गीता-दर्शन

17 Aug 2023 16:20:21
 
 

Osho 
 
अन् आता तर त्यांनी अशी यंत्रेच तयार केली आहेत की त्यावरून कळते की त्या व्यक्तीला स्वप्न पडत आहे की नाही. त्यामुळे आता कुणी झाेपणाऱ्याने स्वत: फसण्याचा किंवा इतरांना उत्तरे देताना फसविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला जर आठवत नाहीये मग हे स्वप्न रेकाॅर्ड कसं झालं? असं ते सकाळी म्हणू शकत नाहीत. आता हे यंत्र तुमच्या डाे्नयाजवळ लावले जाते रात्रभर.तुम्ही झाेपलात की याचे काम चालू हाेते. ते रात्रभर आलेख दाखवीत राहते. स्वप्न आले का? केव्हा स्वप्न नाही इत्यादी, हळूहळू आलेख इतका विकसित झाला आहे की कामुक स्वप्न चालू असले तर त्याची पण वार्ता ते यंत्र आलेखाद्वारे देते. त्याच्या शाईचा रंग आपाेआप बदलेल. मस्तकातील तंतू जेव्हा कामुक उत्तेजनेने भारले जातात, तेव्हा त्यांचे कंपन तंत्र, वेव्हज, लाटलांबी इत्यादी गाेष्टी आपाेआपच बदलतात.त्या सगळ्या फरकांची दखल आलेख अवश्य घेताे.
 
आता तुमच्या तथाकथित ब्रह्मचारीजनांची माेठी पंचाईत हाेऊन जाणार आहे. कारण दिवसभर ब्रह्मचर्य पाळणे फार साेपे आहे.रात्री मात्र प्रश्न उद्भवताे ताे झाेपेचा, स्वप्नाचा.आता तेही आलेखाद्वारे पाहिले जाईल. याच्यात आता काहीएक अडचण नाही. कारण स्वप्नाची क्वालिटी, गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते.प्रत्येक प्रकारच्या स्वप्नाच्या वेळची जी श्वास- क्रिया चालते तिची लय अन् गति ही वेगवेगळी असते. जेव्हा काही कामाेत्तेजन झाल्याचे स्वप्न पडत असते, तेव्हा श्वास एकदम विक्षिप्त हाेताे.आणि आलेख म्हणजे बिलकूल वेडासारखी रेषा दाखवू लागताे. तर झाेप जेव्हा अगदी खाेलवरची असते तेव्हा श्वास बिलकूल बंदच पडताे म्हणतात. आलेख फक्त सरळरेषा दाखवू लागताे. आता ताे कंपन अजिबात रजिस्टर करीत नसताे.
Powered By Sangraha 9.0