आयटीआयमध्ये 75 व्यर्च्युअल ्नलासरूमचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन

16 Aug 2023 15:43:27
 
 


ITI
 
 
 
 
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त राज्यात 75 व्हर्चुअल क्लासरूमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन हाेणार आहे.सह्याद्री अतिथीगृह येथे दिनांक 15 ऑगस्ट 2023 राेजी दुपारी 12 वाजता राज्यातील औद्याेगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये दूरदृष्य प्रणाली द्वारे हे उद्घाटन हाेणार आहे.यावेळी काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लाेढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. काैशल्य विकास मंत्री मंत्री श्री.लाेढा म्हणाले, व्हर्चुअल क्लासरूममध्ये इंटरक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे.
 
प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांच्या संकल्पनेतील मस्कील इंडियाफ व मडिजिटल इंडियाफ या उपक्रमातंर्गत राज्यातील 419 या सर्व औद्याेगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.राज्यात काैशल्य, राेजगार, उद्याेजकताव नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे 419 शासकिय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण व 547 खाजगी औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून राज्यात युवक व युवतींना राेजगाराभिमुख काैशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.या कार्यक्रमास काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,राेजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0