गीतेच्या गाभाऱ्यात

16 Aug 2023 16:03:23
 
 
पत्र सत्ताविसावे
 
Bhagvatgita
शंकराचार्य म्हणतात.सत्त्वप्रधानस्य ब्राह्मणस्य, सत्त्वाेपसर्जनरज:प्रधानस्य क्षत्रियस्य,तमउपसर्जनरज:प्रधानस्य वैश्यस्य, रजउपसर्जनम:प्रधानस्य शुद्रस्य- यावरून तुला समजून येईल कीसत्त्वगुण प्रधान -ब्राह्मण, सत्त्वगुण गाैण रजाेगुण प्रधान - क्षत्रिय, तमाेगुण गाैण रजाेगुण प्रधान- वैश्य रजाेगुण गाैण तमाेगुण प्रधान शुद्र.रामानुजाचार्य म्हणतात - चातुर्वण्यप्रमुखं कृत्स्नं जगत् सत्त्वादिगुणविभागेन निर्माण केले.मध्वाचार्य म्हणतातसात्त्विक: ब्राह्मण:, सात्त्विकराजस:क्षत्रिय:, राजस तामस: वैश्य: तामस: शूद्र: इति गुणविभाग:। सात्त्विक - ब्राह्मण सात्त्विक राजस -क्षत्रिय राजस तामस -वैश्य तामस - शूद्र वल्लभाचार्य म्हणतातसत्त्वप्रधाना: विप्रा:, सत्त्वरज: प्रधाना: क्षत्रिया:, रज: तम: प्रधाना: वैश्या:, तम:प्रधाना:शुद्रा:। वल्लभाचार्यांचा विचार मध्वाचार्यांप्रमाणे आहे.
 
ज्ञानेश्वर म्हणतातआता याचिपरी जाण। चाऱ्ही आहेती हे वर्ण। सृजिले म्या गुण। कर्म बिभागे।। एथ एकचि हे मनुष्यप्राणी। परी जाहले गा चहू वर्णी। ऐसी गुणकर्माे कडसणी। केली जहजें।। तुला समजून येईल की गुणकर्मावरून वर्ण ठरवण्यात आला तर त्यांत कांही वावगे नाही. पण जन्मावरून वर्ण ठरवण्यात आला. व अमुक एक मनुष्य अमुक वर्णाचा असे जन्मावरून ठरवल्यावर त्याचे ठिकाणी त्या वर्णाचे गुण-कर्म देखील असतात हे मानणे बराेबर नाही.तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे कीकाही लाेकांना कृष्णाला नावे ठेवण्यात बरे वाटते.पंढरपूरच्या गाेफण पत्राचे एके काळचे संपादक श्री. पांडुरंग भानुदास डिंगरे एम.ए. यांनी असे विचार मांडले आहेत कीश्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दाेन सैन्याच्या मध्ये नेला व आपले तत्त्वज्ञान सांगून त्याने अर्जुनाचा रथ नरकाकडे नेला.रा.रा. डाेंगरे दुर्याेधनाचा पक्ष घेतात व कृष्णाच्या विरुद्ध बाेलतात हे पाहून तुला आश्चर्य वाटेल.
 
महाभारतकार व्यासांनी दुर्याेधनाला वाईट म्हटले आहे व कृष्णाला चांगले म्हटले आहे पण काही बुद्धिमान लाेकांचा असा स्वभाव असताे कीज्याला लाेकांनी चांगले म्हटले आहे त्याच्यात जास्तीत जास्त दाेष दाखवायचे व त्याची निंदा करावयाची आणि ज्याला लाेकांनी वाईट म्हटले आहे त्याच्यात जास्तीत जास्त गुण दाखवून स्तुती करावयाची. असे करण्याने आपल्या बुद्धिमत्तेचा प्रकाश पडताे, असे या लाेकांना वाटते.कृष्णाला कुणी वाईट म्हटले की तुला वाईट वाटते.रा. डाेंगरे दुर्याेधनाला भले चांगले म्हणू द्यात पण कृष्णाच्या तत्त्वज्ञानाने अर्जुनाचा रथ नरकाप्रत नेला गेला हे त्यांचे मत पटण्यासारखे नाही. तुला कृष्णाचे तत्त्वज्ञान पटते.कितीतरी पत्रात जगातील निरनिराळ्या विद्वानांचे गीतेच्या तत्त्वज्ञानाबद्दल काय मत आहे, हे मी तुला समजून सांगितले आहे. ती पत्रे तू नीट वाच. तुझी खात्री हाेईल की गीतेच्या तत्त्वज्ञानानेच जगाचे खरेखुरे कल्याण हाेईल. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात.
Powered By Sangraha 9.0