त्यामुळे परिणाम जाे आहे ताे सारा सूचनांचा, सजेशनचा आहे, खरा परिणाम औषधांच्या वस्तुंचा नाहीये. म्हणून तर इत्नया पॅथीज चालतात.किती त्या पॅथीज? काय वेडेपणाची गाेष्ट आहे. खरेच जर आजार बरे हाेताहेत तर वैज्ञानिक अर्थाने इत्नया पॅथीज असू शकतात काय? चालू शकतात काय? हाेमिओपॅथी पण चालते. अन् हाेमिओपॅथीच्या नावावर, जवळजवळ नुसत्या साखरेच्याच गाेळ्या तर चालतात.निदान, भारतात बनलेल्या तरी साखरेच्याच असतात. साखरसुद्धा शुद्ध असेल की नाही याची ‘वानवाच’. आठ प्रकारच्या औषधांनी सगळे आजार बरे हाेतात. अन् बायाेकेमिस्ट्रीही चालते.
तशी औषधांची गरज पडत नाही, तरी नॅचराेपॅथी चालते. पाेटावर पाण्याची पट्टी किंवा मातीची पट्टी ठेवली की बस आजार गेला पळून.यंत्र, मंत्र, तंत्र सगळं चालतं. काय भानगड काय आहे? अन् सगळ्यांनी माणूस बरा हाेताे. माणूस बरा हाेण्याचे प्रकार माेठे अजबच म्हणायला पाहिजेत.म्हणजे, शंका अशी आहे की माणसाचे हे जे एवढे आजार आहेत ते सूचनांमुळेच तर हाेत नाहीत ना. आपण आजारी आहाेत अशी त्याची फक्त मान्यता आहे.ताे बरा हाेताे ताेही आपल्या अशाच मान्यतेमुळे. आपण आता बरे झालाे आहाेत.म्हणजे बरेच आजार असे खाेटेच झाले म्हणायचे.मनाचे खेळ सगळे, दुसरे काय?