ओशाे - गीता-दर्शन

06 Jul 2023 15:40:05
 
 

Osho 
 
इतकी माणसं सांगताहेत, ते काय चुकीचं असेल? मानसशास्त्रज्ञ म्हणताहेत, आज जगात इतकी अप्राैढ चित्तं दिसतात, त्याला शिक्षक, शिक्षणव्यवस्था हीच जबाबदार आहेत. तू असा आहेस.असं संमाेहन मुलांवर इथंच केलं जातं. तू असा आहेस असं म्हटलं जातंय, वृत्तपत्रात नाव- फाेटाेसह छापून येतंय मग सिद्धच हाेऊन जातं ना हा माणूस असा आहे.आजाऱ्याच्या अंथरुणात असताना कधी विचार केलाय? सगळेच जण कधी ना कधी आजारी पडत असतातच. आजारी पडलं की माेठाच शीण येताे. माेठीच बेचैनी येते.
 
एवढा माेठा हा आजार, कधी बरा हाेणार असं आतून वाटत राहतं डाॅ्नटर आले, नुसते त्यांचे बूट वाजले, त्यांचा चेहरा दिसला, स्टेथाेस्काेप दिसला की आजार थाेडासा पळून जाताेच. डाॅ्नटरांनी अजून औषध दिलेलं नाही, फक्त चाैकशी केली, थाेडं तपासलं, कुठं थाेडं ठकठकावलं, त्यांना काय पाहायचं हाेतं ते त्यांनी पाहिलं, त्यांनी आपलं स्पेशलायझेशन दाखवलं.त्यांनी म्हटलं, ‘काही विशेष नाही, थाेडंसं आहे. दाेन दिवसात औषधानं आपला आजार आता पळालाच. कधी विचार केलात का अजून डाॅ्नटरांचं प्रिस्क्रिप्शन, इंजे्नशन, औषध वगैरे तर काहीच आलेलं नसतं, तरी आजार पळू लागलेला असताे. मन स्वत:लाच समजावू लागतं.
Powered By Sangraha 9.0