ओशाे - गीता-दर्शन

05 Jul 2023 12:23:13
 
 

Osho 
 
ही शांती खाेटी आहे. ही शांतीची केवळ भ्रांती आहे पण ती हाेऊ शकते.ही मनाची क्षमता आहे, हे मन अशाप्रकारे स्वत:ला फसवू शकतं.सेल्फडिसेप्शन, आत्मवंचनेची मनाची माेठी, फारच माेठी क्षमता आहे. आपण घाेकत राहाल तर हे हाेऊ शकतं.अप्राैढ चित्ताचं कारण संमाेहित शिक्षण हे आहे. हे हाेऊ शकतं याचा स्वीकार तर आता मानसशास्त्रज्ञ करू लागले आहेत, ते अगदी रास्त आहे.शाळेत एक शिक्षक एका मुलाला म्हणतात.‘तू गाढव आहेस. तू गाढव आहेस’.
 
त्या मुलाच्या दुसऱ्या वर्गातील दुसरा शिक्षकही त्याला उद्देशून पुन: पुन: हेच म्हणजे तू गाढव आहेस म्हणतात.एखादा मुलगा जेव्हा आपल्याबद्दल असं घाेकलेलं ऐकताे तेव्हा ताेही आपल्या मनात घाेळू लागताे मी गाढव आहे, मी गाढव आहे.दुसरी मुलं पण त्याला, ‘हा गाढव आहे, हा गाढव आहे’ असंच म्हणत राहतात. घरी जाताे तर वडील पण म्हणतात, ‘तू गाढव आहेस.’ जिथं जावं तिथं हेच ऐकायला मिळतं, फक्त कानच कमी आहेत.मी गाढव आहे, असं जेव्हा इतके सगळेजण म्हणताहेत तेव्हा त्याचं मन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू लागते, लाेक म्हणताहेत ते बराेबर असलंच पाहिजे, मग त्याप्रमाणेच आपण वागत राहावे.
Powered By Sangraha 9.0