गीतेच्या गाभाऱ्यात

04 Jul 2023 14:58:41
 
 
पत्र बाविसावे
 
Bhagvatgita
मी माडीवर गेलाे. काहीतरी वाचायचं म्हणून तेथे पडलेले एक पुस्तक वाचू लागलाे.एकदा एक मनुष्य रामकृष्ण परमहंसांकडे गेला व म्हणाला - ‘‘ मी संसाराचा त्याग करणार आहे व माझे सारे जीवन परमार्थाला वाहणार आहे.’’ रामकृष्णांनी विचारले - ‘‘तुझ्या घरी काेण आहे?’’ ताे मनुष्य म्हणाला- ‘‘ माझ्या घरी म्हातारी आई आहे. बाकी काेणी नाही तिला माझ्याशिवाय दुसरे काेणी नाही.’’ रामकृष्ण म्हणाले - ‘‘बेटा! घरी जा. तुझ्या आईची मरेपर्यंत मनापासून सेवा कर. हाच तुझा खरा परमार्थ...’’ ती गाेष्ट वाचून मला वेगळेच वाटू लागले.मी खाली आलाे आईला नमस्कार केला व म्हटले - ‘‘आई मी पुण्याला जाताे व परीक्षेला बसताे’’ माझ्या पाठीवर हात ठेवून आई म्हणाली - ‘‘राम! माेठा हाे पण कृष्णभक्त हाे!’’ मी तात्यांना नमस्कार केला व म्हटले - ‘‘तात्या मी पुण्याला जाताे व परीक्षेला बसताे’’ तात्या म्हणाले - ‘‘कृष्णाने तुला चांगली बुद्धी दिली.
 
कृष्णच आपला त्राता आहे.’’ मी पुण्याला गेलाे व परीक्षा देऊन परत आलाे.निकाल लागणेस अद्याप दीड दाेन महिन्यांचा अवकाश हाेता. व्यासांना अठरा आकडा फार प्रिय. गीतेचे अठरा अध्याय आहेत. मी दाेन दिवसात सबंध गीता अठरा वेळा म्हणू लागलाे. ‘‘गीता माझी माता कृष्ण माता पिता’’ अशी माझी अवस्था झाली.निकालाचा दिवस जवळ आला. त्यावेळी मुंबईस निकाल लागावयाचा व गावाेगावी तेथून तारा जावयाच्या.माझे काका मुंबईस राहात हाेते. ते तार करणार हाेते.सांगलीचे माझे बरेच मित्र बी.ए. च्या परीक्षेस बसले हाेते.त्यांच्या तारा दुपारी दाेनच्या सुमारास आल्या. त्यांनी माझ्याकडे येऊन आनंदाची बातमी दिली. काेणी तिसऱ्या वर्गात पास झाले हाेते, तर काेणी दुसऱ्या वर्गात पास झाले हाेते.
 
माझी तार मात्र येईना. माझे काका काेणतेही काम अगदी वेळेवर करत असत. दाेन वाजले, तीन वाजले, चार वाजले तरी तार आली नाही. पाच वाजून गेले मग मात्र निराशेचे साम्राज्य पसरले. पाल चुकचुकली व काेणीतरी म्हणाले- ‘‘राम नापास झाला असेल.’’ ते शब्द ऐकून आई रडू लागली व म्हणाली - ‘‘माझं मेलीचं चुकलं. आजपर्यंत रामचा नेहमी वर्गात पहिला नंबर असायचा; आमच्यामुळे त्याला नापास व्हावं लागलं.पुरुषासारखे पुरुष असून तात्या रडू लागले. ते म्हणाले - ‘‘आमच्याकरता रामला नापासाचा कलंक लागला.’’ *** आणि इत्नयात दारात तारवाला आला. काकांनी तार केली हाेती - कशरीीूं उेपसीर्रीींश्ररींळेपी. झरीीशव ऋळीीीं उश्ररीी.
अभिनंदन. बी.ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण.आई एकदम आनंदाने अंथरुणावर उठून बसली व म्हणाली - ‘‘राम! देव पावला.’’ तात्यांच्या दु:खाचे रूपांतर आनंदाश्रूंत झाले. ते मला शाबासकी देऊन म्हणाले - ‘‘राम! कृष्णाच्या कृपेनं आमचा पुनर्जन्म झाला.’’
Powered By Sangraha 9.0