म्हाताऱ्यांचा मृत्यू जवळ येताे तसतशी त्यांना तीन-चार तासांपेक्षा जास्त झाेपेची गरज पडत नाही. कारण शरीरात आता निर्माण काेणी व्हायचे नसते, आता शरीर विसर्जित व्हायची तयारी करत असते. आता झाेपेची फारशी गरज नाही. झाेप हे निर्माणशील तत्त्व आहे. जाेवर शरीरात काही नवे बनत असते ताेवरच झाेपेची गरज असते.जेव्हा नवीन तयार हाेणे बंद झालेले असते.तेव्हा म्हाताऱ्या माणसांना, खरे सांगायचे तर झाेप येतच नसते. मुलेच फक्त खऱ्या अर्थाने झाेपतात, म्हातारी माणसं फक्त थकूनविश्राम करीत असतात. कारण आता मृत्यू जवळ येत चाललेला असताे. जगात सगळीकडेच शिक्षक अन् शिक्षक म्हातारे असणार हे ओघानेच येते.
सांगत सुटतात- चार वाजले उठा, तीन वाजले उठा, मग माेठी अडचण हाेते. म्हातारी माणसं शिक्षक असतात मग ते मुलांना टाळता येत नसते. पण प्रमाण मात्र बिघडून जातेच.जेवणाच्याही बाबतीत असेच हाेते. लहान मुलांचे जेवण किती असावे आपण त्यांच्या प्रकृतीवर साेपवीत नसताे. त्यांनी किती खायचे हे आई आपल्या आग्रहाने ठरवते. नकाे, नकाे, असं एकसारखे मुलं म्हणत असतात- आम्हाला नकाे खायला. पण मायेने आईबाप मात्र मुलांना जास्त खाऊ घालण्याच्या मागे लागलेले असतात.एकदा का प्राकृतिक संतुलन बिघडले की प्रकृती विपरीत अतिरेकाकडे जाते. पण संतुलनाकडे वळणे फार अवघड हाेऊन बसते.आपण सारेजण मुलांच्या झाेपेच्या, खाण्याच्या संतुलनाच्या सवयी नष्ट करीत असताे.