तुका म्हणे भार । माथां टाका अहंकार ।।2।।

22 Jul 2023 22:18:53
 
 

saint 
 
अहंकाराच्या निर्मितीस माणूस स्वत:च कारणीभूत असताे. त्यामुळे अहंकाराला, मीपणाला काढून टाकण्याची जबाबदारी ही त्याची स्वत:चीच असते. ज्याला ह्या जबाबदारीची जाणीव हाेते, त्याला अहंकार सहजपणे काढून टाकता येऊ शकताे. मूळात अहंकार ओझेच वाटत नसेल किंवा याला काढून टाकणे इष्ट आहे, असे जीवाला वाटतच नसेल तर अहंकार नष्ट हाेण्याचा प्रश्नच निर्माण हाेत नाही.खरे म्हणजे अहंकारामुळे केवळ डाेक्यातील विचाराचेच ओझे वाढते असे नव्हे तर खऱ्या अर्थाने माणसाच्या मनावर याचे ओझे वाढत असते. डाेक्यावरचे ओझे उतरवण्यासाठी काेणाची मदत घेता येऊ शकते किंवा डाेक्यावरचे ओझसहजपणे उतरवता येते.
 
पण मनावरील वाढलेले ओझे सहजपणे उतरवता येत नाही. विशेष म्हणजे इतरांना डाेक्यावरचे ओझे दिसते, पण मनावरचे ओझे दिसतही नाही. अशा न दिसणाऱ्या पण आपणाला अंत:र्बाह्य पाेखरून टाकणाऱ्या या ओझ्यापासून दूर व्हायचे असेल तर आपण अहंकाराला, मीपणाला काढून टाकायलाच हवे.मूळात हा देहच नाशवंत व पराधिन असल्यामुळे या देहावर अहंकार बाळगणे म्हणजे भाेक पडलेल्या नावेत भर समुद्रात संसार थाटण्यासारखे आहे.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0