जेव्हा डाे्नयात पीडा असते, ते जड झालेले असते, तेव्हाच आपणाला डाे्नयाच्या अस्तित्वाची जाणीव हाेते.नाही तर आपणाला आपल्या डाे्नयाचा पत्ताही नसताे. जाेवर काहीही डाेकेदुखी नसते ताेवर आपण ‘बिनडाेकपणे’ जगत असता असेच म्हणाना. जर आपण बराेबर समजलात तर डाेकेदुखी हेच डाेके आहे.त्याशिवाय डाे्नयाचा पत्ताच लागत नाही आपणांस.डाेकेदुखी असेल तर लगेच कळते. पाेटात काही दुखत असेल तर पाेटाची आठवण हाेते.हाताला काही पीडा असेल तर हाताची जाणीव हाेते.जर आपले शरीर पूर्णपणे स्वस्थ असेल तर आपणास शरीराची जाणीवही हाेत नाही. आपण विदेह हाेऊन जाता.
आपणास देहाची काही आठवण ठेवायची जरुरच पडत नाही. आठवण ठेवायची जरुर तेव्हाच पडते जेव्हा देह काही संकटकाळातून जात असताे, काही अडचण आली असेल तर मग लक्ष ठेवणे जरुर असते. अन् त्यावेळी सर्व शरीराचे ध्यान साेडून, आत्म्याचे ध्यान साेडून, जेथे पीडा आहे त्या छाेट्याशा भागाकडे सारी चेतना धावू लागते.सम्यक आहाराने समत्वयाेगात प्रवेश हाेऊन जाताे. कृष्णाचा हा समत्वयाेग, अर्जुनाला ही सूचना शरीरासंबंधी आहे.कृष्ण म्हणताे की जास्त आहार घेतला तरी याेगात प्रवेश हाेऊ शकणार नाही. कारण जास्त आहार घेताच सगळी चेतना पाेटाकडे धावू लागते.