माेक्षास कैसे जाणावे । माेक्ष काेणास म्हणावे ।।1।।

17 Jul 2023 18:52:58
 
 
 

saint 
सातव्या ‘‘माेक्षलक्षण’’ समासाच्या सुरुवातीलाच श्रीसमर्थ म्हणतात की, अनेकांना बद्ध म्हणजे काेण आणि माेक्ष म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असताे. त्यामुळे अशा श्राेत्यांच्यासाठी बद्ध व माेक्ष याची ाेड करून सांगणे आणि संतांच्या संगतीने माेक्षाचा मार्ग कसा प्राप्त हाेताे ते समजावून घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या संकल्पाने आणि हा देह म्हणजेच मी आहे अशा खाेट्या समजुतीने जाे ऐहिक व दृश्य जगच सत्य आहे असे मानून चालताे त्यालाच बद्ध म्हणतात. अशाला देहाचे ममत्व येऊन देहसुखाचीच ओढ निर्माण हाेते. पाप केले तर दु:ख हाेईल आणि पुण्य केले तर सुख मिळेल या कल्पनेत ताे गुरफटून जाताे.
 
त्यामुळे सुखाच्या लालचीने स्वत:लाच कर्ता समजून अनेक कर्मे करीत राहताे. रेशमाचा किडा जसा स्वत:च्याच अंगातून काेश निर्माण करताे आणि त्या काेशातच गुंतून मरण पत्करताे अगदी त्याचप्रमाणे बद्ध कर्माच्या माेहात आणि फळात गुंतून जन्ममृत्यूच्या ेऱ्यामध्ये अडकून जाताे.असा बद्ध स्वत:च कसा मुक्त हाेण्याची इच्छा न धरता पुनर्जन्माचाच विचार करताे हे त्याच्या पुण्य जाेडण्याच्या मार्गावरूनही दिसून येते. या जन्मी दान करू म्हणजे पुढच्या जन्मी श्रीमंती मिळेल असे म्हणतच ताे दान करताे. ते करतानाही एखादा रुपया दिला तर पुढे लाखाे रुपये मिळावेत आणि भिकाऱ्याला चतकाेर भाकरी घालून पुढे विपुल अन्नधान्याची आशा धरताे.एखादा तांबडा पैसा आणि ाटके वस्त्र देऊन त्याची परतेड परमेश्वर पुढील जन्मी लाखपटींनी करेल ही वासना बाळगताे.
Powered By Sangraha 9.0